For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजयदुर्गवरील तोफेला मिळणार तोफगाड्याचा आधार

11:47 AM Mar 11, 2025 IST | Radhika Patil
विजयदुर्गवरील तोफेला मिळणार तोफगाड्याचा आधार
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

तिन्ही बाजूंनी समुद्री पाण्याचे संरक्षण असलेल्या विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) किल्ल्याच्या महादरवाजावळील 3 व किल्ल्यावरील तुळजा भवानी मंदिराजवळील 1 जखिणीची तोफ केवळ तोफगाड्याअभावी उघडवर पडून आहेत. या तोफा गेल्या कित्येक वर्षांपासून कडक ऊन, पाऊस आणि थंड हवा सोसत आहे. युद्ध सामुग्रीतील या तोफा किल्ल्याच्या वैभव सांगताहेत. असे असले तरी या चारही तोफांकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळेच त्यांना आधार देत किल्ल्याची शान वाढवण्यासाठी शिवाजी पेठ, फिरंगाई मंदिराजवळील छत्रपती ब्रिगेडने पुढाकार घेतला आहे. सध्या 67 हजार ऊपये खर्चुन ब्रिगेडने सागवाणी लाकडापासून एक तोफगाडा बनवला आहे. या तोफगाड्यावर चारपैकी एक तोफ ठेवली जाणार आहे.

येत्या 17 मार्च रोजीच्या शिवजयंतीचे औचित्य साधून तोफगाड्यावर दोन मीटर लांबीची तोफ ठेवण्याच्या कार्यक्रम केला जाणार आहे. तोफगाड्यावर तोफ ठेवण्यासाठी मुंबईतील भारतीय पुरातत्व सर्व्हेशन विभागाची परवानगी घेतल्याचे छत्रपती ब्रिगेडचे अध्यक्ष अमित कोळेकर व सचिव अतुल माने यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, तोफगाडा नेमका कसा असावा याचा छत्रपती ब्रिगेडने अभ्यास केला आहे. अभ्यासानुसार सागवाणी लाकूड मिळवून ते पिंपळे (ता. पन्हाळा) येथील सुतार प्रद्युम्न सुतार यांच्याकडे दिले. त्यांनी मोठी वजनदार तोफेचा भार पेलेले इतक्या ताकदीचा तोफगाडा बनवला आहे. मंगळवार 11 रोजी हा तोफगाडा पिंपळे गावातून कोल्हापुरात आणला जाणार आहे. त्याचे सद्गुऊ विश्वनाथ महाराज ऊकडीकर ट्रस्टचे अध्यक्ष आनंदराव सांगवडेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता विश्वपंढरीमध्ये हा कार्यक्रम होईल. येत्या 17 मार्च रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून तोफगाडा किल्ल्यावर नेण्यात येईल.

तोफगाड्यावर 2 मीटर लांबीची तोफ ठेवली जाणार आहे. तत्पूर्वी छत्रपती ब्रिगेडचे कार्यकर्ते किल्ल्याच्या वरील भागाची साफसफाई करतील. तसेच किल्ल्यावरील तुळजा भवानीमातेच्या मंदिर परिसराचीही स्वच्छता करतील. गडपूजनाचा धार्मिक विधी केल्यानंतर सर्वजण भवानीमातेच्या मंदिराजवळ एकत्र येतील. मंदिरातील भवानीमातेच्या मूर्तीला दोन कृत्रिम डोळे अर्पण केले जातील. देवीची आरती कऊन साडी-चोळीही अर्पण केली जाईल. या कार्यक्रमासाठी सरदार घराण्यापैकी असलेल्या धुळप कुटुंबातील सदस्यांना निमंत्रित केले आहे. त्यांच्या उपस्थितीत उर्वरीत तीन तोफांसाठी तोफगाडा बनवण्याचा संकल्प केला जाणार आहे. त्यासाठी लागणारे पैसे उभे करणे आव्हान असणार आहे. परंतु हे आव्हान पेलण्यास आम्ही समर्थ आहोत, असे छत्रपती ब्रिगेडचे कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत आहेत.

विजयदुर्ग किल्ल्याचा अष्टशताब्दी महोत्सव 2005 साली साजरा झाला होता. या सालापासून छत्रपती ब्रिगेड प्रत्येक वर्षी किल्ल्याची साफसफाई करण्याचे काम करत आहे. 30 ते 40 कार्यकर्ते त्यासाठी श्रमदान करत असतात. साफसफाई करता करता किल्ल्यावरील तोफांना तोफगाड्याचा आधार देण्याचे ब्रिगेडने ठरवले. ब्रिगेडने पैसे उभा करत एक भारदस्त तोफगाडा तयार केला आहे. उर्वरीत 3 तोफांसाठी लोकसहभागातून, नेतेमंडळींकडून पैसे उभा करण्याचे ब्रिगेडने ठरले असल्याचे सचिव अतुल माने यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.