For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रियांकांसह चार जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

11:13 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रियांकांसह चार जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
Advertisement

एकूण 19 जणांचे उमेदवारी अर्ज

Advertisement

चिकोडी : चिकोडी लोकसभा मतदारसंघामध्ये गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी काँग्रेसकडून मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी यांच्यासह गजानन पुजार, महेश कासार, काशिनाथ कुरणी या  अपक्षांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे दाखल केले. चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्याच दिवशी 12 एप्रिल रोजी एकसंबा येथील आप्पासाहेब कुरणे, चिकोडी येथील मोहन मोटण्णवर तर हारुगेरी येथील शंभू कल्लोळकर या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी भाजपकडून आण्णासाहेब जोल्ले यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी पुन्हा एकसंबा येथील आप्पासाहेब कुरणे व अथणी येथील विलास मण्णूर यांनी प्रत्येकी एक असे एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकसंबा येथील कुमार संभाजी डोंगरे यांनी कर्नाटक राष्ट्रीय समिती पक्षाच्यावतीने व हुक्केरी तालुक्यातील यरनाळ येथील संमेद सरदार वर्धमाने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

बुधवारी तंगडी (ता. अथणी) येथील श्री गुरु काडसिध्देश्वर आश्रमच्या काडय्या शंकरय्या हिरेमठ यांनी अखिल भारत हिंदू महासभेच्यावतीने तर नसलापूर (ता. रायबाग) येथील भीमसेन दत्ता सनदी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजता प्रियांका जारकीहोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार लक्ष्मण सवदी, आमदार आसिफ (राजू) शेठ, आमदार महेंद्र तमन्नवर, आमदार गणेश हुक्केरी, आमदार राजू कागे, राहुल जारकीहोळी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, महावीर मोहिते, माजी मंत्री ए. बी. पाटील, माजी आमदार काका पाटील, युवा नेते उत्तम पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, महावीर मोहिते, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, रोहण साळवे यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित होते. गुरुवारी अपक्ष म्हणून कल्लोळ येथील गजानन पुजार, गुलबर्गा जिह्यातील देवीनगर येथील नरोगा (ता. आळंद) येथील महेश शांताप्पा कासार, करगाव (ता. चिकोडी) येथील काशिनाथ कल्लाप्पा कुरणे यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.