For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार

07:57 PM Dec 25, 2023 IST | Kalyani Amanagi
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार
Advertisement

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळास दिली ग्वाही

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींची आणि प्रश्नांची मला जाणीव आहे. त्यामुळे बुधवारी ( 27 रोजी ) हा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागलमध्ये कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने आयोजित मोर्चासमोर मुश्रीफ बोलत होते. कामगार नेते अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. संघटनेच्यावतीने त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Advertisement

कामगार नेते अतुल दिघे म्हणाले, ‘मानधन नको वेतन हवे’ ही आमची मुख्य मागणी आहे. सरकारने तीन जानेवारीपर्यंत या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा 50 हजाराहून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस मुंबईत दाखल होतील. निवेदनामध्ये विविध मागण्यांचा समावेश आहे. पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ मोठे भाऊ.........!

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सुरुवातीच्या काळात बहुतांशी अंगणवाडी सेविकांच्या नेमणुका मीच केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या अडीअडचणी आणि प्रश्नांची मला जाणीव आहे. हा धागा पकडत कामगार नेते अतुल दिघे म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मोठे भाऊ आहेत. त्यांनी तमाम बहिणींची पाठराखण करावी.

Advertisement
Tags :

.