मालवण बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
11:16 AM Aug 28, 2024 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
व्यापारी वर्गाने स्वतः हून ठेवली दुकाने बंद
Advertisement
मालवण । प्रतिनिधी
Advertisement
पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शासन प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यासाठी मालवणात आज आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आक्रोश मोर्चात सहभागी होण्याकरिता मालवणातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वतःहून बंद ठेवत मालवण बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या आक्रोश मोर्चात तमाम शिवप्रेमी नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन महाविकास आघाडी तर्फे नागरिकांना करण्यात आले होते.त्याच धर्तीवर आज व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत कडक निषेध केला .
Advertisement
Next Article