महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मंगळवारी शेअर बाजारात परतली तेजी

06:32 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 305 अंकांनी वधारला : ऑटो, धातू निर्देशांकांची मजबुत कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंब

Advertisement

ऑटो आणि धातू निर्देशांकांच्या दमदार कामगिरीमुळे भारतीय शेअरबाजार मंगळवारी तेजीसमवेत बंद झाला. सेन्सेक्स निर्देशांक 305 अंकांनी वधारत बंद झाला. दिवसभरात बाजारात चढउतार होता.

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 305 अंकांनी वधारत 73095 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 76 अंकांनी वाढत 22198 अंकांवर बंद झाला. शेअरबाजारात मंगळवारी मोठ्या प्रमाणामध्ये चढउतार पहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये शेअरबाजाराची सुरुवात काहीशा घसरणीने झाली होती. नंतर मात्र बाजार सावरताना दिसला. सेन्सेक्स निर्देशांकामधील 30 पैकी 19 कंपन्यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत. तर 11 समभाग मात्र घसरणीत असलेले पहायला मिळाले.

टाटा मोटर्स, टीसीएस आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग मंगळवारच्या सत्रामध्ये सर्वाधिक वाढलेले पहायला मिळाले. तर या उलट हिरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स आणि एसबीआय यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिलेले पाहायला मिळाले. मंगळवारी व्होडाफोन आयडियाचे समभाग 3 टक्के घसरणीत होते तर देवयानी इंटरनॅशनलचे समभाग 6टक्के घसरणीत राहिले होते.

निफ्टी आयटी आणि बँक निर्देशांक काहीशा तेजीसह कार्यरत होते. बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी मिडकॅप 100 यांचे निर्देशांक कमकुवत होते. टाटामोटर्सचे समभाग 3 टक्के तेजीत होते. या सोबत इंडसइंड बँक, भारती एअरटेल, सन फार्मा आणि सिप्ला यांचे समभाग तेजीसोबत बंद होते. बजाज फायनान्स डिव्हीज लॅब्ज, बजाज फिनसर्व्ह, युपीएल आणि अदानी एंटरप्रायझेस यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. टाटामोटर्स, पॉवरग्रिड कॉर्प, सन फार्मा, सिप्ला, महिंद्रा, रिलायन्स आणि एसबीआय लाईफ यांचे समभाग 52 आठवड्यानंतर उच्चांकावर पोहोचले होते. निफ्टीतील फायनॅन्शीयल सर्व्हिसेसचा निर्देशांक कमकुवत होत बंद झाला. तर फार्मा, एफएमसीजी आणि ऑटो निर्देशांक तेजीसमवेत बंद झाला. धातू निर्देशांकातील कंपन्यांची कामगिरीसुद्धा चांगली दिसून आली.

जागतिक बाजारामध्ये पाहता अमेरिकेमध्ये मिश्र कल पहायला मिळाला. डोव्ह जोन्स निर्देशांक 12 अंकांनी वधारत होता तर नॅसडॅक 7 अंकांनी घसरणीत होता. युरोपातील बाजार तेजीत कार्यरत होते. आशियाई बाजारातदेखील मिश्र कल पहायला मिळाला. यामध्ये निक्केई, हँगसेंग व शांघाय कंपोझिट यांचे निर्देशांक तेजीत होते. दुसरीकडे कोस्पी व सेट कंपोझिट घसरणीत होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article