बाजारात तेजीचा प्रवास कायम
सेन्सेक्स 319 तर निफ्टी 98.60 अंकांनी मजबूत : तिमाही निकालांकडे गुंतवणूकदारांच्या नजरा
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रात पुन्हा एकदा बीएससी सेन्सेक्स आणि एनएससी निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले आहेत. यात डिसेंबरमध्ये अमेरिकेत महागाई कमी झाल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा होती. याशिवाय, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीच्या बातमीचा बाजाराच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम झाला आहे. दिवसअखेर सेन्सेक्स गुरुवारी 600 अंकांनी वाढून 77,319 वर खुला झाला. मात्र अंतिम क्षणी मात्र सेन्सेक्स 318.74 अंकांनी मजबूत होत 0.42 टक्क्यांनी वाढून 77,042.82 वर बंद झाला. तसेच, राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) चा निफ्टी देखील मजबूत वाढीसह 23,377.25 वर उघडला. व्यवहार बंद होताना तो 98.60 अंकांनी मजबूत होत 23,311.80 वर बंद झाला.
यांचे समभाग चमकले
सेन्सेक्सच्या 30 कंपन्यांपैकी, अदानी पोर्ट्सचे शेअर्स सर्वाधिक तेजीसह बंद झाले. बजाज फिनसर्व्ह, भारत एअरटेल, एसबीआय, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, रिलायन्स, मारुती, अॅक्सिस बँक, टाटा स्टीलचे शेअर्स प्रामुख्याने वधारुन बंद झाले. दुसरीकडे, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, झोमॅटो, टीसीएस, आयटीसी, सनफार्मा, एशियन पेंट्स, टायटन आणि इन्फोसिसचे शेअर्स कमी दराने बंद झाले.
रिलायन्स आणि इन्फोसिसवर नजर
तिमाहीच्या निकालांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये हालचाल दिसून आली. बेंचमार्क इंडेक्समधील हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज आणि खाजगी क्षेत्रातील बँक अॅक्सिस बँकेचे शेअर्स सुमारे 1.1 टक्क्यांनी वाढले. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे शेअर्स 1.21 टक्क्यांनी घसरून बंद झाले.
जागतिक बाजारपेठेतून
अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीवरील आशादायक अपडेटमुळे वॉल स्ट्रीटवर झालेल्या तेजीनंतर गुरुवारी जागतिक शेअर बाजारांमध्ये वाढ झाली. आशियाई व्यापारात, जपानचा बेंचमार्क निक्केई 225 0.3 टक्क्यांनी वाढून 38,572.60 वर बंद झाला. हाँगकाँगचा हँग सेंग 1.2 टक्क्यांच्या तेजीसह 19,522.89 वर बंद झाला, तर शांघाय कंपोझिट इंडेक्स सुमारे 0.3 टक्केनी वाढून 3,236.03 वर बंद झाला.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- अदानी पोर्ट 1151
- स्टेट बँक 766
- बजाज फिनसर्व्ह 1696
- भारती एअरटेल 1631
- टाटा मोटर्स 774
- इंडसइंड बँक 975
- एनटीपीसी 325
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1268
- मारुती सुझुकी 12103
- अॅक्सिस बँक 1040
- बजाज फायनान्स 7249
- अल्ट्राटेक सिमेंट 10642
- टाटा स्टील 127
- आयसीआयसीआय 1253
- कोटक महिंद्रा 1805
- महिंद्रा-महिंद्रा 2983
- एचडीएफसी बँक 1654
- सनफार्मा 1763
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3518
- अंबुजा सिमेंट 539
- वेदान्ता 449
- बँक ऑफ बडोदा 228
- एसबीआय लाईफ 1515
- कॅनरा बँक 97
- हॅवेल्स इंडिया 1557
- हिंडाल्को 602
समभाग घसरलेल्या कंपन्या
- एचसीएलटेक 1791
- नेस्ले 2170
- इन्फोसिस 1926
- हिंदुस्थान युनि 2345
- आयटीसी 432
- टीसीएस 4208
- झोमॅटो 242
- एशियन पेन्ट्स 2216
- पॉवरग्रिड कॉर्प 298
- टायटन 3319
- विप्रो 288
- ल्यूपिन 2099
- मॅरिको 651
- हिरोमोटो 4073
- आयशर मोटर्स 5046