कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुरुवारीही शेअरबाजारात तेजीची चमक कायम

07:00 AM Sep 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 320 अंकांनी तेजीत, फेडरलने केली व्याज दरात कपात

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने पाव टक्का व्याज दरामध्ये कपातीची घोषणा केल्यानंतर भारतीय शेअरबाजारात गुरुवारी तेजी कायम राहिली. आयटी आणि फार्मा क्षेत्रातील समभागांच्या कामगिरीमुळे भारतीय शेअर बाजारात उत्साह कायम राहिला. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 320 अंकांनी वाढत 83013 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 93 अंकांनी वाढत 25423 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 234 अंकांनी तेजीसह 55727 अंकांवर बंद झाला. मिडकॅप-100 224 अंकांनी वाढत 59073 अंकांवर तर स्मॉलकॅप-100 46 अंकांनी वाढत 8894 अंकांवर बंद झाला. सलग तिसऱ्या सत्रामध्ये भारतीय शेअरबाजार तेजीसह कार्यरत राहिला.

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने पाव टक्का इतकी व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली. याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारातील गुंतवणूकदारांवर दिसून आला. फेडच्या या निर्णयामुळे फार्मा आणि आयटी समभागांमध्ये खरेदी पहायला मिळाली. सकाळच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 400 अंकांनी वाढत 83108 अंकांवर तर निफ्टी 25441 अंकांवर तेजीसह खुला झाला होता. आयटी आणि ऑटो निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी तर ऑईल व गॅस निर्देशांक सातव्या दिवशी तेजीमध्ये पहायला मिळाला. आयटीमध्ये एलटीआय माईंड ट्री आणि कोफोर्ज यांचे समभाग सर्वाधिक तेजीत पहायला मिळाले. फार्मा क्षेत्रात बायोकॉन आणि लॉरस लॅब्ज यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. एनएमडीसी व जिंदाल स्टील यांनी धातू निर्देशांकाला तेजी मिळवून देण्यासाठी हातभार लावला. रुपया 88.12 च्या स्तरावर घसरणीसह बंद झाला. फार्मा निर्देशांक सर्वाधिक 1.5 टक्के वाढलेला होता. ऑटो निर्देशांकामध्ये अशोक लेलॅण्ड आणि एक्साईड यांचे समभाग सर्वाधिक तेजीत पहायला मिळाले.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article