गुरुवारीही शेअरबाजारात तेजीची चमक कायम
सेन्सेक्स 320 अंकांनी तेजीत, फेडरलने केली व्याज दरात कपात
वृत्तसंस्था/मुंबई
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने पाव टक्का व्याज दरामध्ये कपातीची घोषणा केल्यानंतर भारतीय शेअरबाजारात गुरुवारी तेजी कायम राहिली. आयटी आणि फार्मा क्षेत्रातील समभागांच्या कामगिरीमुळे भारतीय शेअर बाजारात उत्साह कायम राहिला. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 320 अंकांनी वाढत 83013 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 93 अंकांनी वाढत 25423 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 234 अंकांनी तेजीसह 55727 अंकांवर बंद झाला. मिडकॅप-100 224 अंकांनी वाढत 59073 अंकांवर तर स्मॉलकॅप-100 46 अंकांनी वाढत 8894 अंकांवर बंद झाला. सलग तिसऱ्या सत्रामध्ये भारतीय शेअरबाजार तेजीसह कार्यरत राहिला.
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने पाव टक्का इतकी व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली. याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारातील गुंतवणूकदारांवर दिसून आला. फेडच्या या निर्णयामुळे फार्मा आणि आयटी समभागांमध्ये खरेदी पहायला मिळाली. सकाळच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 400 अंकांनी वाढत 83108 अंकांवर तर निफ्टी 25441 अंकांवर तेजीसह खुला झाला होता. आयटी आणि ऑटो निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी तर ऑईल व गॅस निर्देशांक सातव्या दिवशी तेजीमध्ये पहायला मिळाला. आयटीमध्ये एलटीआय माईंड ट्री आणि कोफोर्ज यांचे समभाग सर्वाधिक तेजीत पहायला मिळाले. फार्मा क्षेत्रात बायोकॉन आणि लॉरस लॅब्ज यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. एनएमडीसी व जिंदाल स्टील यांनी धातू निर्देशांकाला तेजी मिळवून देण्यासाठी हातभार लावला. रुपया 88.12 च्या स्तरावर घसरणीसह बंद झाला. फार्मा निर्देशांक सर्वाधिक 1.5 टक्के वाढलेला होता. ऑटो निर्देशांकामध्ये अशोक लेलॅण्ड आणि एक्साईड यांचे समभाग सर्वाधिक तेजीत पहायला मिळाले.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- इटर्नल 337
- एचडीएफसी लाईफ 784
- सनफार्मा 1648
- इन्फोसिस 1540
- सिप्ला 1578
- विप्रो 256
- एचडीएफसी बँक 976
- एसबीआय लाईफ 1821
- जेएसडब्ल्यू स्टील 1121
- डॉक्टर रे•ाrज लॅब्ज 1322
- एचसीएल टेक 1493
- पॉवरग्रीड कॉर्प 289
- एचयुएल 2586
- अॅक्सिस बँक 1133
- श्रीराम फायनान्स 626
- बजाज फिनसर्व्ह 2069
- आयटीसी 411
- आयशर मोटर्स 6924
- अदानी पोर्ट 1412
- जियो फायनॅशियल 317
- ग्रासीम 2817
- नेस्ले 1209
- टाटा स्टील 172
- हिरो मोटो कॉर्प 5370
- महिंद्रा-महिंद्रा 3642
- टेक महिंद्रा 1550
- कोटक महिंद्रा 2054
- आयसीआयसीआय 1421
- एनटीपीसी 336
- टीसीएस 3176
- मारुती सुझुकी 15817
- रिलायन्स 1415
- हिंडाल्को 750
- लार्सन टुब्रो 3686
समभाग घसरलेल्या कंपन्या
- कोल इंडिया 393
- टाटा मोटर्स 711
- बजाज फायनान्स 996
- ट्रेंट 5144
- अल्ट्राटेक सिमेंट 12626
- टाटा कंझ्युमर 1129
- एशियन पेंट्स 2478