For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राधानगरी तालुका देखरेख संघाच्या वास्तूची पुनर्बांधणी व्हावी

03:22 PM Jun 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
राधानगरी तालुका देखरेख संघाच्या वास्तूची पुनर्बांधणी व्हावी
radhanagri
Advertisement

स्थानिक व सहकार क्षेत्रातील नागरिकांची मागणी
राधानगरी/ महेश तिरवडे
राधानगरी तालुका देखरेख संघ मर्यादित राधानगरी संस्थेची इमारत राधानगरी येथे गावठाण हद्दीत साडेतीन गुंठे क्षेत्रात असून 1971 मध्ये सहकार क्षेत्रातील सर्वच प्रतिनिधी एकत्र येऊन काम करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ही इमारत उभी केली होती, मात्र नोव्हेंबर 2016 मध्ये या संस्थेची नोंदणी रद्द झाल्याने या इमारतीची मालकी महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्यात आली.
या इमारतीमध्ये 1982 ते 1 जानेवारी 2022 या 40 वर्षाच्या काळात नाममात्र भाड्याने सहाय्यक निबंधक कार्यालय सुरू होते. 2022 पासून ही इमारत जीर्ण झाल्याने, प्राथमिक सुविधांचा अभाव, इमारतीला झाडे व वेलीचा विळखा, वानरांचा उपद्रव, सरपटणारे प्राण्यांचा त्रास यामुळे सहायक निबंधक यांचे कार्यालय जानेवारी 2022 ला स्थलांतरीत करण्यात आले. ही इमारत दुमजली असल्याने या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट व निर्लेखन करून या जागेवर नवीन इमारत बांधून तेथे सहकार भवन बांधण्यात यावे अशी मागणी स्थानिक व सहकार क्षेत्रातील नागरिकांतून होत आहे, जेणेकरून तालुक्यातील सहकारी क्षेत्रातील सर्वलोक या ठिकाणी एकत्र येऊन काम करतील व या ठिकाणी वर्दळ वाढून स्थानिक नागरिकांना याचा दैनंदिन कामकाजासाठी उपयोग होईल.

Advertisement

सहकार क्षेत्राचा पायाच ज्या राधानगरी तालुक्यातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी साकारलेल्या धरणावर आजही अवलंबून आहे.
त्याच तालुक्यामध्ये संपूर्ण जिह्याला आदर्श ठरावी,अशी सहकार भवनची इमारत साकारणे ही मागणी खरोखरच रास्त आहे. लोकप्रतिनिधींनी यात पुढाकार घेतल्यास हे सहज शक्य आहे.
-लक्ष्मण पाटील, विकास सेवा संस्था, सचिव कसबा तारळे.

Advertisement
Advertisement
Tags :

.