अर्थसंकल्पाने बदलला ‘गेमिंग’चा गेम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यंदाच्या अर्थसंकल्पाने भारताच्या गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स सेक्टरचे जगच बदलून टाकले आहे. गेमिंग आता केवळ मनोरंजन नव्हे तर एक मोठी अर्थव्यवस्था असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारने एबीजीसी कंटेंट क्रिएटर लॅब्स सेटअपची घोषणा केली असुन याच्या माध्यमातून छोट्या शहरांमधील टॅलेंटेड युवांनाही विशेष टूल्स आणि सॉफ्टवेअर मिळू शकतील. यामुळे भारतात जागतिक दर्जाचे गेम्स तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ई-स्पोर्ट्स : आता खऱ्या खेळाचे मैदान
अर्थमंत्र्यांनी ई-स्पोर्ट्सला एक व्यावसायिक क्रीडाप्रकाराच्या स्वरुपात आणखी मजबुती देण्याचे संकेत दिले आहेत. अर्थसंकल्पात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 12.2 लाख कोटीची तरतूद असून याचा अर्थ वेगवान 5जी कनेक्टिव्हिठी आणि कमी ‘लॅग‘ असा आहे. आता भारतीय ई-स्पोर्ट्स अॅथलिट्स कुठल्याही टेक इंट्रप्शनशिवाय इंटरनॅशनल टूर्नामेंट्मसध्ये भाग घेऊ शकतील. तसेच गेमिंगला स्पोर्ट्स गुड्स मॅन्युफॅक्चरिंगसोबत जोडून पाहिले जातेय. यामुळे गेमिंग गियर आणि अॅक्सेसरीज स्वस्त होण्याची अपेक्षा आहे.
एआय आणि स्कीलिंग : गेमर्स होणार डेव्हलपर्स
सरकारने एआयला गेमिंगचे भविष्य ठरविले आहे. अर्थसंकल्पात नवी कौशल्ये शिकविण्यासाठी निधीची तरतूद असून याचा एक मोठा हिस्सा गेमिंग आणि ग्राफिक्स डिझाइनिंग यासारख्या अभ्यासक्रमांवर खर्च होणार आहे. म्हणजेच आता गेमिंग शिकण्यासाठी महाग खासगी संस्थांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत.
-छोट्या शहरांमधील युवांना गेमिंग आणि डिझाइन शिकण्याच्या संधी मिळणार
-शाळा-महाविद्यालयांमध्ये नव्या लॅब्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
-गेमिंग अन् डिजिटल कंटेंट इंडस्ट्रीत नोकऱ्यांची शक्यता वाढणार
-हे क्षेत्र मोठ्या आर्थिक हिस्स्याच्या स्वरुपात तयार होऊ लागणार