महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

द बकिंघम मर्डर्स’चा ट्रेलर सादर

06:01 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

13 सप्टेंबरला होणार प्रदर्शित

Advertisement

द बकिंघम मर्डर्स या चित्रपटासाठी करिना कपूर, एकता कपूर आणि हंसल मेहता हे दिग्गज एकत्र आले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आता सादर करण्यात आला असून तो सस्पेंस आणि थ्रिलरने युक्त आहे. करिना कपूरनेच हा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Advertisement

करिना कपूर या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या हत्येप्रकरणी काही मुस्लीम युवकांना ताब्यात घेतले जाते. यानंतर पोलीस अधिकारी या युवकांची चौकशी करत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. हत्येप्रकरणी पाच संशयति असून यातील खरा आरोपी कोण याचा शोध घेताना करिना दिसून येणार आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्रीचा एक वेगळा अवतार दिसून येत आहे.

द बकिंघम मर्डर्स हा चित्रपट 13 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात करिना कपूर, ऐश टंडन, रणवीर बरार आणि कीथ एलन यासारखे कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. असीम अरोडा, कश्यप कपूर आणि राघव राज कक्कड यांनी याची कहाणी लिहिली आहे. हा चित्रपट महाना फिल्म्स आणि टीबीएम फिल्म्सकडून निर्माण करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article