कर्नाटकाच्या सिद्धी मल्लांची चमक
06:44 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, अंबिकापूर (छत्तीसगड)
Advertisement
येथे सुरू असलेल्या 2026 च्या खेलो इंडिया ट्रायबल क्रीडा स्पर्धेत कर्नाटकाच्या सिद्धी जमातीतील मल्लांनी चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये सिद्धी जमातीतील 9 मल्लांनी कर्नाटकाचे प्रतिनिधीत्व केले. त्यापैकी तीन मल्लांनी सुवर्ण आणि एकाने रोप्यपदक मिळविले.
महिलांच्या 76 किलो गटात कर्नाटकाच्या मनीषा जुवा सिद्धीने, रोहन दोडमनीने पुरूषांच्या 60 किलो ग्रीकोरोमन गटात तसेच 68 किलो गटात प्रिन्सिटा फर्नांडीस सिद्धीने सुवर्ण पदके मिळविली. तर महिलांच्या 57 किलो वजन गटात शालिना सय्यर सिद्धीने रौप्यपदक पटकाविले. रोहन दोडमनी हा धारवाड जिल्ह्dयातील रहिवासी आहे.
Advertisement
Advertisement