For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा यांची चमक

06:31 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
हार्दिक पंड्या  अक्षर पटेल  हर्षित राणा यांची चमक
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

2025-26 च्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील सध्या सुरू असलेल्या विविध सामन्यांत हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, यांनी दमदार शतके झळकविली. तर अर्शदीप सिंग, हर्षित राणा यांनी भेदक गोलंदाजी केली.

गुजरात विजयी

Advertisement

गुजरात आणि आंध्रप्रदेश यांच्यातील झालेल्या सामन्यात अक्षर पटेलने गुजरात संघाकडून खेळताना दमदार शतक झळकविले. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 318 धावा जमविल्या. अक्षर पटेलने आक्रमक फटकेबाजी करताना 5 षटकार आणि 11 चौकारांसह 111 चेंडूत 130 धावा झोडपल्या. लिस्ट ए क्रिकेटमधील अक्षर पटेलचे हे पहिले शतक आहे. त्यानंतर आंध्रप्रदेशने 7 बाद 311 धावा जमविल्याने गुजरातने हा सामना 7 धावांनी जिंकला.

पंजाब विजयी

पंजाब आणि सिक्कीम यांच्यातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात पंजाबने सिंक्कीमचा 10 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात सिक्कीमचा डाव 22.2 षटकांत 75 धावांत आटोपला. त्यानंतर पंजाबने बिनबाद 81 धावा जमवित हा सामना एकतर्फी जिंकला. पंजाब संघातील अर्शदीप सिंगने 34 धावांत 5 गडी बाद केले. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

हार्दिकचे शतक वाया

बडोदा आणि विदर्भ यांच्यातील झालेल्या सामन्यात विदर्भने बडोदा संघाचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात बडोदा संघाकडून खेळणाऱ्या हार्दिक पंड्याने 11 षटकार आणि 8 चौकारांसह 133 धावा झोडपल्या. पण विदर्भच्या विजयामुळे त्याचे हे शतक वाया गेले. विदर्भने 1 बाद 296 धावा जमवित हा सामना 9 गड्यांनी जिंकला. विदर्भच्या अमन मोखाडेने 17 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 150 धावांची खेळी केली. या सामन्यात हार्दिक पंड्याने विदर्भचा फिरकी गोलंदाज पार्थ रेखाडेच्या एका षटकांत 5 षटकार आणि आणि 1 चौकार असे एकूण 34 धावा झोडपल्या.

दिल्ली विजयी

दिल्लीने सेनादलाचा 8 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सेनादलाचा डाव 42.5 षटकांत 178 धावांत आटोपला. दिल्ली संघातील हर्षित राणाने 47 धावांत 4 गडी बाद केले. प्रिन्स यादवने 3 बळी मिळविले. त्यानंतर दिल्लीने 19.4 षटकांत 2 बाद 182 धावा जमवित हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. दिल्ली संघातील प्रियांशु आर्यने 45 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 72 तर नितीश राणाने 1 षटकार आणि 5 चौकारांसह 32 तसेच कर्णधार ऋषभ पंतने 37 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 67 धावा झोडपल्या.

Advertisement
Tags :

.