For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime News | पुलाची शिरोली हादरली! सोशल मीडियावरून जाळ्यात ओढून १५ तरुणींवर अत्याचार; मुख्य आरोपी अटकेत

11:52 AM Apr 28, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime news   पुलाची शिरोली हादरली  सोशल मीडियावरून जाळ्यात ओढून १५ तरुणींवर अत्याचार  मुख्य आरोपी अटकेत
Advertisement

                                    पुलाची शिरोलीत १५ तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त

Advertisement

हातकणंगले -हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून १८ ते २२ वयोगटातील अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, संशयिताने संबंधित तरुणींना लॉजवर नेऊन त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि ते व्हायरल करण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी देत त्यांच्यावर सतत शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात सुमारे १५ पेक्षा अधिक तरुणींचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

राजारामपुरी पोलीस ठाण्यात २० वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत शाहिद सनदे आणि त्याचा साथीदार शाहरुख देसाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शाहिदला अटक केली असून शाहरुख देसाई सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपी हा फार्मसीचे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

घटनेनंतर पुलाची शिरोली गावात तीव्र प्रतिक्रिया उमटली. गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध करत गाव बंद पाळला आणि संबंधित आरोपीच्या कुटुंबावरही कारवाई करण्याची मागणी केली. सकल हिंदू समाजाच्या वतीने गावाच्या प्रवेशद्वारापासून ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांची पूर्वपरवानगी नसल्यामुळे हा मोर्चा काढण्यास पोलिसांनी मनाई केली.

यानंतर पोलिसांनी गावकऱ्यांना तपासाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर परिस्थिती काहीशी शांत झाली आणि गावकऱ्यांनी मोर्चा न काढता निषेध नोंदवला. या दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही वेळ शाब्दिक बाचाबाचीही झाली.

या आंदोलनस्थळी अमल महाडिक यांनी भेट देऊन गावकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. तसेच शिवसेना (ठाकरे गट) चे नेतेही या आंदोलनात सहभागी झाले होते. गावकऱ्यांनी पोलिस प्रशासन आणि आमदार अमल महाडिक यांच्याकडे ग्रामपंचायतीमार्फत कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांकडून अधिक तपशील समोर येण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.