महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महिलांनी तयार केलेला ब्रिज अनोखी वास्तुकला अन् सौंदर्यामुळे प्रसिद्ध

06:46 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लंडनमध्ये थेम्स नदी ओलांडणारा एक रस्ता आणि पायी चालण्यासाठी एक पूल असून तो ब्लॅकफ्रियर्स ब्रिज आणि हंगरफोर्ड ब्रिज तसेच गोल्डन ज्युबली ब्रिजदरम्यान आहे. याचे नाव 1815 मध्ये वाटरलूच्या लढाईत ब्रिटिश, डच आणि पर्शियाच्या विजयाच्या स्मृतिप्रित्यर्थ ठेवण्यात आले आहे. साधारण दिसणाऱ्या या पूलाचे ऐतिहासिक महत्त्व असून तो अनेक कारणांनी स्मरणीय मानला जातो.

Advertisement

प्रारंभी या ब्रिजचे नाव दुसरेच होते. वेस्टमिंस्टर आणि ब्लॅकप्रियर्सदरम्यान थेम्सवर या पूलाची योजना स्वत:ला स्ट्रैंड ब्रिज कंपनी म्हणवून घेणाऱ्या एका कंपनीने मांडली होती. तेव्हा याला स्ट्रैंड ब्रिज म्हटले जायचे. परंतु तो पूर्ण होण्यापूर्वी संसदेच्या एका अधिनियमामुळे नाव बदलून वाटरलू ब्रिज करण्याचा आदेश देण्यात आला.

Advertisement

वाटरलू ब्रिज निर्माण करण्याचा उद्देश टोल वसूल करत स्वत:च्या खर्चांची भरपाई करणे होते. परंतु हा उद्देश पूर्ण होऊ शकला नाही, कारण ज्या कुणाला नदी ओलांडण्याची गरज भासायची तो नव्या टोल ब्रिजच्या दोन्ही बाजूला असलेल्या ब्लॅकफ्रियर्स आणि वेस्टमिंस्टर ब्रिजचा वापर करायचा आणि हे दोन्ही मोफत होते. याचमुळे हा प्रकल्प एक वाईट वित्तीय योजना ठरला. अखेर 1877 मध्ये हा टोलमुक्त झाला.

पहिला वाटरलू ब्रिज वास्तुशिल्पाच्या दृष्टीकोनातून अत्यंत सुंदर मानला जायचा. जॅन रेनी यांच्या कॉर्निश ग्रेनाइटच्या 120 फुटांच्या 9 अर्थअंडाकृती मेहराबांच्या डिझाइनचे मोठे कौतुक झाले होते. इटालियन मूर्तिकार कॅनोवाने याला जगातील सर्वात महान पूल संबोधिले होते. या पूलाने अनेक चित्रांना प्रेरित केले होते.  वाटरलू ब्रिजला लेडीज ब्रिज या नावानेही ओळखले जाते. कारण याला युद्धादरम्यान महिला कर्मचाऱ्यांनीच निर्माण केले होते. नव्या वाटरलू ब्रिजची निर्मिती 1939 मध्ये सुरू झाली होती. हे काम अनेक कारणांमुळे मंदगतीने सुरू होते. या पूलाच्या निर्मितीकरता 1941 पर्यंत केवळ 50 पुरुषच उपलब्ध होते, यानंतर या पूलाची निर्मिती महिलांनी केली आणि आता महिलांनी निर्माण केलेला हा एकमात्र पूल असल्याचे मानले जाते.

वाटरलू ब्रिज ब्रिटनच्या थेम्स नदीवरील एकमेव पूल होता जो दुसऱ्या महायुद्धात नष्ट झाला होता. आज नदीला पार करणाऱ्या या ब्रिजला जाइल्स गिल्बर्ट स्कॉट यांनी डिझाइन केले होते. स्कॉट इंजिनियर नव्हते अणि त्यांच्या डिझाइनला साकारणे अत्यंत अवघड होते, परंतु तरीही त्यांनी यश मिळविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article