विवाहाच्या दिवशीच वधू-वर करतात पलायन
अनोखी आहे प्रथा
विवाहाच्या सोहळ्या अशा अनेक प्रथा पार पाडल्या जातात, ज्याबद्दल कळल्यावर लोक दंग होत असतात. भारतात विविध ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये विवाहाशी निगडित अजब परंपरा आणि प्रथा पाळल्या जात असतात. दक्षिण अ मेरिकेतील व्हेनेझुएला या देशात विवाह सोहळ्यांदरम्यान एका अजब प्रथेचे पालन केले जाते. व्हेनेझुएलात विवाहाचे विधी पार पडल्यावर एका अनोख्या परंपरेचे पालन केले जाते. तेथील विवाहसोहळ्यात कदाचित वधू आणि वरच दिसून येणार नाहीत. भारताप्रमाणेच तेथेही मोठ्या संख्येत पाहुण्यांना विवाहासाठी आमंत्रित केले जाते. पाहुणे सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांना वधू-वर दिसून येत नाहीत. हा प्रकार विचित्र वाटत असला तरीही तेथे लोक या कृतीला शुभ मानतात. व्हेनेझुएलाच्या या परंपरेच्या अंतर्गत विवाहाच्या दिवशी वधू-वराला पळून जायचे असते. मित्रपरिवार अन् पाहुणे विवाहात पोहोचताच त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत अन् सत्कार केला जातो. येथे पाहुण्यांचा निरोप न घेताच नवदांपत्य सोहळ्यातून गुपचूपपणे निघून जाते. परंतु लोक याला चुकीचे मानत नाहीत. ही परंपरा नवविवाहित दांपत्याच्या जीवनात सौभाग्य आणते असे मानले जाते.