महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अनधिकृत शाळांचे पितळ उघडे पडणार

11:04 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

24 रोजी शिक्षण विभाग जारी करणार यादी : पालक-विद्यार्थ्यांची टळणार फसवणूक

Advertisement

बेळगाव : खासगी शिक्षण संस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यातील बऱ्याचशा शाळा शिक्षण विभागाची परवानगी न घेताच सुरू आहेत. बेळगाव जिल्ह्यातही अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने परवानगी घेऊन जागा मिळेल तेथे खासगी इंग्रजी माध्यम शाळा सुरू केल्या आहेत. यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सार्वजनिक शिक्षण विभागाने अधिकृत खासगी शाळांची यादी जाहीर करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना केल्या आहेत. इंग्रजी माध्यम शाळेला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने गल्ली-बोळात शाळा सुरू होत आहेत. शाळेत प्रवेश घेण्यासाठी वारेमाप डोनेशन देण्याची तयारी पालकांची असल्याने इंग्रजी माध्यम शाळांचे फावले आहे. काही शाळांनी नोंदणी करताना कन्नड माध्यम म्हणून नोंदणी केली असून प्रत्यक्षात मात्र इंग्रजी माध्यम शाळा चालविल्या जात आहेत. तसेच काही जणांनी अनेक वर्षांपासून परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याची बाब समोर आली आहे.

Advertisement

विनापरवाना शाळा चालविल्या जात असल्याने याचा परिणाम भविष्यात विद्यार्थ्यांवर होऊ शकतो. अनेकवेळा शाळा अधिकृत की अनधिकृत? याची माहिती पालकांना नसल्याने फसगत होते. यासाठी 2024-25 या शैक्षणिक वर्षात अधिकृत शाळांची यादी 24 रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे. शहर विभागाची यादी विश्वेश्वरय्यानगर येथील कार्यालयात तर बेळगाव ग्रामीण विभागाची गणपत गल्ली येथील 2 नंबर शाळेत प्रसिद्ध केली जाणार आहे. 25 रोजी प्रत्येक शाळेच्या आवारात ही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामुळे शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची फसगत होणार नाही. अधिकृत शाळांची नोंदणी सॅट्स या पोर्टलवर देण्यात आली असून यामध्ये शाळेचा पत्ता, नाव, नोंदणी क्रमांक, माध्यम, परवान्याची वैधता यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. काही शाळांनी परवानगी घेताना राज्य सरकारचा अभ्यासक्रम शिकविण्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र सीबीएसई अभ्यासक्रम शिकविला जात आहे. तर काही ठिकाणी जास्त वर्ग भरविले जात आहेत. तर नोंदणी नसतानाच शाळा चालविल्या जात आहेत. काही ठिकाणी तर पूर्वपरवानगी नसताना शाळांचे इतर उपनगरांमध्ये स्थलांतर केल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे.

उशिरा सुचलेले शहाणपण...

पुढील शैक्षणिक वर्षात अधिकृत शाळांची यादी जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. परंतु, एलकेजी-युकेजी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी महिन्यातच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दाखल केला आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन दीड ते दोन महिने उलटल्यानंतर आता सरकारने अधिकृत शाळांची यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे उशिरा सुचलेले शहाणपण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article