महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गंगावळीत बेपत्ता वृध्देचा मृतदेह आठ दिवसांनी सापडला

10:09 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेपत्ता असलेल्या आणखी तिघांचा शोध सुरू

Advertisement

कारवार : अंकोला तालुक्यातील शिरुर येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सण्णा (सीती) हणुमंत गौडा (वय 64, रा. उळूवरे) या वृध्देचा मृतदेह मंगळवारी सकाळी गंगावळी नदीत आणि अरबी समुद्राच्या संगमावरील मंजुगुणी येथे आठ दिवसांनी आढळला. त्यामुळे शिरुर दुर्घटनेतील मृतांची संख्या आठ झाली आहे. शिरुर येथे दुर्घटना 16 जुलै रोजी घडली होती. अद्याप तिघे जण बेपत्ता आहेत. यामध्ये केरळमधील लॉरीचालक अर्जुन (वय 29), स्थानिक युवक लोकेश नाईक (वय 30) आणि जगन्नाथ नाईक (वय 61) यांचा समावेश आहे. या शिवाय जोयडा तालुक्यातील जगलबेट येथून केरळकडे लाकडाची वाहतूक करणाऱ्या लॉरीचा शोध लागलेला नाही. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा आणि ट्रकचा शोध घेण्यासाठी गेले सात दिवस एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय नौदल, अग्निशमन दल, किनारपट्टी पोलीस दल, आयआरबी कंपनीकडून शोध  घेण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दुर्घटना स्थळी बेळगाव येथून भारतीय सेनेचे सैनिक दाखल झाले आहेत. अथक परिश्रमानंतर अनेक यंत्रणाच्या वापर करुन राष्ट्रीय हमरस्त्यावरील दरड, मातीचे ढिगारे हटविण्यात आता कुठे यश आले आहे. दरड हटवूनही केरळमधील

Advertisement

लॉरी हाती न लागल्याने आता सर्वांनी आपली नजर गंगावळी नदीकडे वळविली आहे. दरड कोसळल्यानंतर शेकडो ट्रक माती गंगावळी नदीत गेली आहे. यापैकी काही माती नदीच्या काठावर तर काही माती नदीच्या मध्यभागी आहे. नदीत वाहून गेलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली ट्रक आणि बेपत्ता झालेल्या व्यक्ती गाडल्या गेल्या असाव्यात, अशी शक्यता आहे. सर्व शोध यंत्रणांनी आपला मोर्चा गंगावळा नदीकडे वळविला आहे. यासाठी स्कूबाडायवरर्सकडूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत बेपत्ता झालेल्यांचा आणि लॉरीचा शोध घेण्याचा चंग कारवार अंकोलाचे आमदार सतीश सैल यांनी बांधला आहे. घटनेच्या पहिल्या दिवसांपासून सैल शोधमोहिमेवर नजर ठेवून आहेत. प्रत्येक दिवशी घटनास्थळी भेट देवून सैल दरड हटविण्याच्या कार्याचा आणि शोध मोहिमेची पाहणी करुन आढावा घेत आहेत. मातीच्या ढिगाऱ्याखाली बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी हुबळी, बेंगळूर येथून अत्याधुनिक यंत्रणा आणि उपकरणे उपलब्ध करुन देत आहेत. यासाठी स्वत:च लाखो रुपये खर्च करीत आहेत. पहिल्यांदा बेपत्ता झालेल्यांचा शोध आणि त्यानंतर राष्ट्रीय हमरस्त्यावरील वाहतूक अशी भूमिका आमदार सैल यांनी घेतली आहे.

 दरम्यान जीऑलॉजाकल सर्व्हे 

ऑफ इंडियन शिरुर येथे आणखी दरड कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेची झोप उडाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article