For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रक्तदान चळवळीतील देवदूताची एक्झिट ! रक्तदाता धनंजय पाडळकर यांच्या अचानक निधनाने हळहळ

01:52 PM Mar 09, 2024 IST | Abhijeet Khandekar
रक्तदान चळवळीतील देवदूताची एक्झिट   रक्तदाता धनंजय पाडळकर यांच्या अचानक निधनाने हळहळ
Dhananjay Padalkar
Advertisement

रक्तदान, प्लेटलेट दान कऊन गरजू रूग्णांना दिला आधार, तरूणांची मोट बांधून त्यांनाही रक्त व प्लेटलेट दानकडे वळवले

संग्राम काटकर कोल्हापूर

गरजू ऊग्णांना रक्त, प्लेटलेट देण्यासाठी ते सतत कार्यरत रहायचे. रात्री अपरात्रीही ऊग्णाला रक्तगटानुसार रक्त आणि प्लेटलेट देण्यासाठी ब्लड बँकेत जायचे. ऊग्णाचे प्राण वाचावेत एवढीच त्यांची भावना असायची. ब्लड @ 24 बाय 7 या व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून ते 3 वर्षांपासून गरजू ऊग्णांना रक्त व प्लेटलेट देणारे तऊण उपलब्ध कऊन देण्याचे काम करत होते. त्यामुळे ते रूग्णांसाठी जणू देवदूतच बनले होते. गंगावेश परीसरातील धोत्री गल्ली येथील धनंजय बाळकृष्ण पाडळकर (वय 47) हे त्यांचे नाव. सहा दिवसांपूर्वी धनंजय पाडळकर यांचे न्युमोनियाने निधन झाले आणि त्यांनी रक्तदान आणि प्लेटलेट दानमध्ये केलेल्या कार्याला उजाळा देत अनेकांनी दु:ख व्यक्त केले.

Advertisement

धनंजय पाडळकर यांची अचानक झालेली एक्झिट मित्रमंडळींसह जिह्यातील रक्तदात्यांना जबरदस्त धक्का देऊन गेली. शाळा, कॉलेजमधील मित्रांसह नव्याने बांधलेल्या मित्रांच्या व्हॉटस्अॅप ग्रुप व इस्टाग्रामवर तर धनंजय यांनी रक्तदान, प्लेटलेट दानसाठी दिलेल्या योगदानाच्या आठवणींतून गरजू ऊग्णांचा आधार गेला, अशी भावना व्यक्त झाली आहे. ती त्यांनी ऊग्णांसाठी केलेल्या कामाचा पुरावाच देत आहे.

आपल्यामुळे ऊग्णांचे प्राण वाचावेत, हा उद्देश ठेवून त्यांनी 17 वर्षांपूर्वी रक्तदानाचे व्रत स्वीकारले. त्यांनी आरोग्य सेवेच्या नियमानुसार प्रत्येक 3 महिन्यांनी रक्तदान करायला सुऊवात केली. 18 वर्षात त्यांनी तब्बल 85 वेळा रक्तदान कऊन रक्तदाता अशी ओळख निर्माण केली. प्लेटलेट कमी झालेल्या 90 ते 95 ऊग्णांसाठी ब्लड बँकेत जाऊन त्यांनी प्लेटलेट देण्याचे काम केले आहे. त्यांच्या प्लेटलेट चढवलेले गंभीर ऊग्ण बरेही झाले. ऊग्णांच्या नातेवाईकांकडून मिळणाऱ्या आशिर्वादात धनंजय पाडळकर समाधान मानत होते.

Advertisement

फाईट अगेंस्ट थॅलेसिमीया ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष धनंजय नामजोशी यांनी 2020 मध्ये ब्लड @ 24 बाय 7 हा व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला. रूग्णांसाठी रक्त व प्लेटलेट देणाऱ्या तऊणांना ग्रुपमध्ये अॅड घेतले. 2021 मध्ये धनंजय यांनी या व्हॉटस्अॅप ग्रुपशी स्वत:ला जोडून घेतले. रक्तदानासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन धनंजय पाडळकरांनाही त्यांनी ग्रुप अॅडमिन केले. ग्रुप अॅडमिनला साजेसे काम करताना पाडळकर यांनी रक्त व प्लेटलेट दान कऊ इच्छिणाऱ्यांची मोट बांधली. त्यांना व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये अॅड केल्यामुळे ग्रुपमधील रक्तदान करणाऱ्यांची संख्या 463 वऊन 834 पर्यंत तर प्लेटलेट देणाऱ्यांची संख्या 74 वऊन 125 पर्यंत पोहोचली. समाजातून अथवा सोशल मिडियावरून मिळणाऱ्या माहितीनुसार पाडळकर हे व्हॉटस्अॅप ग्रुपमधील तऊणांना गरजू ऊग्णाला रक्त व प्लेटलेट देण्यासाठी ब्लड बँकेकडे पाठवत होते. तरूणांकडून दिल्या जाणाऱ्या रक्तासह प्लेटलेट वेळच्या वेळी चढवल्या जाऊ लागल्याने रूग्णांची जीवावर बेतणाऱ्या संकटातून सुटका होऊ लागली. आजवर कित्येक ऊग्णांचे प्राण वाचण्यामागे पाडळकर यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे. धनंजय पाडळकर यांचे सप्तहभरापुर्वी निधन झाले, तरीही धनंजय तुझ्या कार्याला विसरणार नाही, अशी भावना मित्र, रक्तदाते व्यक्त करत आहेत.

कर्करोग, डेंग्यू, प्लेटलेट डीसऑर्डर, मलेरिया आदी विकाराग्रस्त ऊग्णांच्या रक्तातील प्लेटलेट मर्यादेपेक्षा कमी होतात. प्रीमॅच्युअर नवजात शिशूसह गंभीर शस्त्रक्रिया केल्या जाणाऱ्या ऊग्णाला प्लेटलेटची आवश्यकता भासते. वेळीच बाहेऊन प्लेटलेट चढवल्या नाहीत तर ऊग्ण दगावू शकतो. अशा स्थितीत धनंजय पाडळकर यांनी पुढाकार घेऊन ऊग्णांना रक्त व प्लेटलेट मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याला तोड नाही.
बाबासाहेब आघाव (व्यवस्थापक : अर्पण ब्लड बँक)

Advertisement
Tags :

.