सर्वात मोठा झोपाळा
बहुमजली इमारतीइतकी आहे उंची
जगातील सर्वात मोठा झोपाळ चीनमध्ये असून त्याला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळाले आहे. हा झोपाळा चोंगकिंगमध्ये असून याची उंची 108 मीटर आहे. ही उंची जवळपास 30 मजली इमारतीइतकी आहे. हा झोपाळा चीनच्या 700 मीटरच्या उंचीच्या टेकडीच्या शिखरानजीक बसविण्यात आला आहे. या झोपाळ्यात बसण्यासाठी धैर्यवान व्यक्ती असायला हवा कारण झोपाळ्यात बसताच लोकांची पाचावर धारण बसते
हा झोपाळ इंद्रधनुष्यी रंगांनी रंगलेला आहे. यामुळे तो पाहण्यास अत्यंत आकर्षक वाटतो. हा झोपाळा 300 फूट उंच मेहराब आणि 355 फूट उंच लाँचिंग टॉवरने तयार झालेला असून तो 130 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने पुढे सरकत असतो. झोपाळ्यात बसलेले लोक आकाशात 88 मीटरच्या उंचीपर्यंत पोहोचू शकतात. झोपाळ्याच्या एका बाजूला खोल दरी आहे.
हा झोपाळा कमकुवत हृदय असलेल्यांसाठी नाही कारण याची सवारी करण्यासाठी मोठी हिंमत असायला हवी, परंतु या झोपाळ्यात बसणाऱ्या लोकांच्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेण्यात आलेली असते. त्यांना सुरक्षा उपकरणे परिधान करायला दिली जातात.
हा झोपाळा युनयांग काउंटीत लाँगगँग दर्शनीय स्थळानजीक आहे. यापूर्वी सर्वात उंच झोपाळ्याचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेतील बिग रख स्विंगच्या नावावर होता, हा झोपाळा चीनमधील या झोपाळ्याच्या तुलनेत 12 मीटर छोटा आहे.