For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भंडारी समाजाची दिनदर्शिका एकमेकांना 'कनेक्ट' ठेवेल !

05:14 PM Dec 26, 2025 IST | अनुजा कुडतरकर
भंडारी समाजाची दिनदर्शिका एकमेकांना  कनेक्ट  ठेवेल
Advertisement

कणकवलीत भंडारी ऐक्यवर्धक मंडळातर्फे दिनदर्शिका प्रकाशन व गुणवंत सत्कारप्रसंगी मनोहर पालयेकर यांचे प्रतिपादन

Advertisement

प्रतिनिधी / कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी समाज मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. कणकवली तालुक्यात समाजाला संघटित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. समाजातील गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची मारलेली थाप त्यांना पुढील करियरसाठी प्रोत्साहन देणारी ठरते. तर समाजाची दिनदर्शिका बाराही महिने समाज बंधू भगिनींना एकमेकांशी 'कनेक्ट' करून ठेवेल, असे प्रतिपादन भंडारी समाजाचे ज्येष्ट नेते मनोहर पालयेकर यांनी केले.कणकवली बाजारपेठेतील लक्ष्मीकांत मुंडये यांच्या क्लासच्या हॉलमध्ये भंडारी ऐक्यवर्धक मंडळ कणकवलीच्यावतीने आयोजित गुणवंत सत्कार व दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमात श्री. पालयेकर बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनंत कांबळी, उपाध्यक्ष शरद चोडणकर, खजिनदार लक्ष्मीकांत मुंडये, नीलेश गोवेकर, विजय मसुरकर, उज्ज्वला घानजी, दिव्या साळगांवकर कणकवली डीएड कॉलेज प्राचार्य शाम सोनुर्लेकर, किशोर राजीवडेकर अशोक मयेकर, विरेंद्र चिंदरकर, विधी चिंदरकर वैष्णवी कवठणकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमात दहावीमध्ये जिल्ह्यात दुसरी व कणकवली तालुक्यात प्रथम आलेल्या विधी चिंदरकर हिचा शाल श्रीफळ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बांदा येथील जनसेवा निधी या संस्थेतर्फे गुरुवर्य तात्यासाहेब नाबर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आदर्श विद्यालय करंजेचे मुख्याध्यापक शरद चोडणकर यांचा सत्कार करण्यात आला. अनंत कांबळी यांनी संघटनेत एकसुत्रता येण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत, असे सांगितले. प्रा शाम सोनुर्लेकर यांनी समाजाला एकत्रित येण्यासाठी विविध कार्यक्रमांचे, स्नेहमेळावे होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले सौ. धानजी यांनी आम्ही महिला दरमहिन्याला संवाद साधतो असे सांगत समाजाच्या बैठकांच्या निमित्ताने विचारांचे आदान प्रदान होते, ओळखी वाढतात , असे सांगितले. विजय मसुरकर यांनी नव्या दमाने संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन केले श्री. चोडणकर यांनी दिनदर्शिका हातात मिळाल्यावर जेवढी चांगली वाटते. तेवढेच कष्ट ती पूर्णत्वास होण्यासाठी लागतात. अनेकजण आतुरतेने या दिनदर्शिकिची वाट पाहत असतात ,त्यानिमित्ताने संवाद व स्नेहभाव वाढीस लागतो. असे सांगितले. श्री. मुंडये यांनी संघटना वाढीसाठी युवा पिढीने पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करतानाच दिनदर्शिका समाजबांधवांपर्यंत पोहचविताना आनंद होत असल्याचे सांगितले.सूत्रसंचालन शरद चोहणकर यांनी केले. तर आभार विजय मसुरकर यांनी मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.