अनगोळ ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ उत्साहात
बेळगाव : श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मंडळ अनगोळ यांच्यावतीने रविवारी सकाळी नाथ पै नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनगोळ येथील सामाजिक कार्यकर्ते दौलत कंग्राळकर यांना सपत्निक पूजेचा मान देण्यात आला. तत्पूर्वी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे माउलींची पूजा करून वारकरी पताकाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पताका विठ्ठल रुक्मिणी मंदिरसमोर उभी करण्यात आली. प्रमुख पाहुणे दौलत कंग्राळकर व संगिता कंग्राळकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यंदा पारायण सोहळा पाच दिवसांचा आयोजित करण्यात येणार आहे. हा सोहळा 2 ते 6 फेब्रुवारी पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी काकड आरती, ज्ञानेश्वरी गाथा भजन, पारायण, कीर्तन, नामजप व प्रवचन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व वारकरी संप्रदायातील वारकरी तसेच गावातील युवक मंडळे, पंच कमिटी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पारायण सोहळा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.