For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संतिबस्तवाड परिसराचे सौंदर्य धोक्यात

10:08 AM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
संतिबस्तवाड परिसराचे सौंदर्य धोक्यात
Advertisement

रस्त्याकडेला फौंड्रीमधील टाकावू माती : पर्यावरण प्रदूषणात वाढ, निर्बंध घालण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर /किणये

तालुक्याच्या पश्चिम भागातील संतिबस्तवाड हा परिसर निसर्गरम्य आहे. झाडे-झुडूपे व हिरवाईने नटलेल्या या भागात आलेल्या प्रत्येकालाच समाधान वाटते. मात्र अलिकडच्या काळात या परिसराचे सौंदर्य धोक्यात आले आहे. रस्त्याच्या बाजूला फौंड्रीमधील टाकावू माती टाकण्यात आल्यामुळे प्रदुषणात वाढ होऊ लागली आहे. ही माती टाकणाऱ्यांवर निर्बंध घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांतून होत आहे. संतिबस्तवाड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला फौंड्रीतील केमिकल मिश्रीत माती टाकण्यात येत आहे. यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ही माती वाऱ्यांमुळे विखरून दुचाकीस्वारांच्या डोळ्यात जाऊ लागली आहे. व्हीटीयूपासून संतिबस्तवाडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला दोन ठिकाणी जुन्या पुलाच्या अलिकडे व पलिकडे टाकावू मातीचे ढिगारे पडलेले आहेत. चक्क रस्त्याच्या बाजूला ही माती टाकण्याचे धाडस काहीजण करीत आहेत. यावर वेळीच निर्बंध घालण्याची गरज आहे, अशी मागणी संतिबस्तवाड गावातील नागरिकांनी केली आहे. या रस्त्यावरून जनावरेही जातात. रस्त्याच्या बाजुला असलेले गवत जनावरांना चारा म्हणून मिळू शकतो. काही शेतकरी जनावरांना चरण्यासाठी या भागात सोडतात. मात्र केमिकलमिश्रीत मातीमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

Advertisement

गेल्या तीन चार वर्षांपासून माती टाकण्याचे प्रकार सुरू- भरमा गुडूमकेरी

संतिबस्तवाड जुन्या पुलानजिकच्या रस्त्यावर या टाकावू मातीचे ढिगारे दिसून येत आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून हे प्रकार सुरू आहेत. रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन काहीजण या ठिकाणी ही माती टाकत आहेत. मंगळवारी तर अगदीच रस्त्याच्या बाजुला माती टाकण्यात आलेली निदर्शनास आली आहे. ही माती सोमवारी रात्री टाकण्यात आल्याचा संशय आहे. या भागातील फौंड्रीमधील टाकावू माती टाकणाऱ्यांना आम्ही ग्रामपंचायतीमार्फत सूचना करणार आहे.

Advertisement
Tags :

.