For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौंदर्य बाजारपेठेची उलाढाल 3 लाख कोटींवर पोहचणार

06:24 AM Feb 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
सौंदर्य बाजारपेठेची उलाढाल 3 लाख कोटींवर पोहचणार
Advertisement

रॅडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्सच्या अहवालामधून माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दरवर्षी देशातील सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी (बीपीसी) बाजारपेठ बदलत आहे. आतापर्यंत घरगुती प्रिक्रिप्शन, मर्यादित खर्च आणि पारंपारिक दुकानांपुरते मर्यादित असलेले हे क्षेत्र 2030 पर्यंत 3.6 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

Advertisement

त्यानंतर भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा बीपीसी बाजार असेल. सध्या, ही बाजारपेठ 2 लाख कोटी रुपये (23 अब्ज डॉलर्स) किमतीची आहे आणि त्यानुसार, भारत पाचव्या क्रमांकावर आहे, असेही रॅडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्सच्या अहवालात म्हटले आहे.

अमेरिका, चीन, जपान आणि ब्राझील हे देश याबाबतीत आघाडीवर आहेत. यानंतर भारताचा नंबर लागतो. रॅडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्सच्या अहवालानुसार, भारतातील बीपीसी बाजारपेठ 12 टक्केच्या चक्रवाढ वार्षिक दराने (सीएजीआर) वाढत आहे. त्यानुसार, भारतातील बीपीसी बाजारपेठ वाढीचा दर संपूर्ण जगात सर्वाधिक आहे. या जलद विस्ताराच्या शर्यतीत अशा कंपन्या पुढे असतील, ज्या प्रत्येक ग्राहकाच्या विशेष गरजांनुसार (वैयक्तिकृत) उत्पादने बाजारात आणतील.

सौंदर्य-वैयक्तिक काळजीवरील खर्चाच्या 50 टक्के इतका 29 वर्षांपर्यंतच्या तरुणांकडे जाईल. जनरल अल्फा (0-15 वर्षे) आणि जनरल जी (14-29 वर्षे) बीपीसी उत्पादनांवर खर्च करण्याच्याबाबतीत मिलेनियल्स (30-45 वर्षे) ला मागे टाकतील. यामुळे 1.8 लाख कोटी रुपयांचा ग्राहक गट तयार होईल. 2024 पर्यंत बीपीसी खर्चात आयएस एज ग्रुपचा वाटा 32 टक्के होता, जो 2030 पर्यंत 50 टक्केपर्यंत वाढू शकतो. जनरल-जी आणि अल्फा पिढी बीपीसी बाजारपेठेला नवीन गती देईल.

Advertisement
Tags :

.