For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘द बॅटमॅन पार्ट 2’ची घोषणा

06:38 AM Jun 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘द बॅटमॅन पार्ट 2’ची घोषणा
Advertisement

सुपरहीरो बॅटमॅनच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. हॉलिवूडचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘दबॅटमॅन पार्ट 2’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. द बॅटमॅन पार्ट 1 ने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. मागील तीन वर्षांपासून ‘द बॅटमॅन पार्ट 2’ची तयारी मॅट रीव्स करत होता, आता एका पोस्टद्वारने त्याने यावर अधिकृत मोहोर उमटविली आहे.

Advertisement

‘द बॅटमॅन पार्ट 2’च्या पटकथेला अंतिम स्वरुप देण्यात आले असून चित्रिकरण अन् निर्मितीपूर्व काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. अलिकडेच दिग्दर्शक अणि लेखक मॅट रीव्सने स्वत:च्या सहलेखिका मॅटसन टॉमलिनसोबत एक पोस्ट शेअर केली आहे. एका छायाचित्रासोबत दिग्दर्शकाने कॅप्शनदाखल ‘पार्टनर्स इन क्राइम (फायटर्स)’ असे नमूद केले आहे. ‘द बॅटमॅन पार्ट 2’ हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. चित्रपट 1 ऑक्टोबर 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. रॉबर्ट पॅटिनसन पुन्हा एकदा डार्क नाइटच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

2022 मध्ये प्रदर्शित मॅट रीव्स दिग्दर्शित बॅटमॅन हा त्या वर्षातील सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 772 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.