For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्तरीतील 11 धबधब्यांवरील बंदी उठविली

12:36 PM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
सत्तरीतील 11 धबधब्यांवरील बंदी उठविली
Advertisement

10 धबधब्यांवर बंदी कायम, वन खात्याकडून करण्यात आलेल्या फेरसर्वेक्षणानंतर आदेश 

Advertisement

वाळपई : चार दिवसांपूर्वी सत्तरी तालुक्यातील व गोव्याच्या वेगवेगळ्या भागातील धोकादायक धबधबे वनखात्याने जाहीर केले होते. धबधब्यांवर जाण्यास बंदी घातल्यानंतर विविध स्तरातून या निर्णयाला विरोध झाला. यामुळे वनखात्याने फेरसर्वेक्षण कऊन सत्तरी तालुक्यातील म्हादई अभयारण्य परिक्षेत्रात येत असलेले 11 पावसाळी धबधबे कमी धोक्याचे असल्याचे जाहीर कऊन सदर धबधब्यांवर भेट देण्यासाठी लावलेले निर्बंध मागे घेतले आहे. यामुळे निसर्गप्रेमी व पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अजूनपर्यंत धबधबे प्रवाहित झालेले नाहीत मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते प्रवाहित होण्याची शक्यता आहे. यामुळे सत्तरी तालुक्यातील म्हादई अभयारण्य क्षेत्रामध्ये येत असलेल्या 11 धबधब्यांवर जाण्यासाठी वन खात्याने परवानगी दिली आहे. चार दिवसांपूर्वी वनखात्याने सत्तरी व गोव्याचे वेगवेगळ्dया भागातील राखीव जंगल अभयारण्य क्षेत्रात येत असलेले धबधबे धोकादायक असून त्या ठिकाणी प्रतिबंध केले होते.

तरीही धबधब्यांवर गेल्यास कारवाईचा इशारा वनखात्याने दिला होता. मात्र सर्वच बाजूने चर्चा व मागणी करण्यात आल्यानंतर वन खात्याने पुन्हा एकदा धबधब्यांचे सर्वेक्षण केले आहे. सदर सर्वेक्षणातून आज नवीन नोटीस जारी केली असून यामध्ये सत्तरी तालुक्यातील पाली, हिवरे, चरवणे, गोळावली, गुळळे, चिदंबरम नानेली, मैदीनी गुळळे यावर जाण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध उठविण्यात आलेले आहेत. यामुळे या धबधबावर भेट देण्यास कोणती अडचण नसल्याचे वन खात्याने जाहीर केलेले आहे. दरम्यान, वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वन खात्याने नवीन आदेश जारी केले असून यात सत्तरीतील काही धबधबे धोकादायक तर काही धबधबे कमी धोकादायक असल्याचे स्पष्ट केले आहे. कमी धोकादायक धबधब्यांवर जाण्यास वनखात्याने परवानगी दिलेली आहे. मात्र जास्त धोकादायक धबधब्यांवर अजूनही प्रतिबंध लावण्यात आलेला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती वनाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे.

Advertisement

दहा धबधब्यांवर धोका

दरम्यान, सत्तरी तालुक्यातील अभयारण्य परिक्षेत्रात येत असलेल्या दहा धबधब्यावर जाण्यास प्रतिबंध लावण्यात आलेला आहे. सदर धबधबे धोकादायक आहेत. यामध्ये बाराजण, लाडक्याचो ओझर, तोणयेर सावर्डे, पेंड्राल, असोडे सुऊंगुली यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.