'बलुतेदारी' पद्धत होतेय कालबाह्य !
नावली :
ग्रामीण भागात नुकतीच खरीप हंगामाची काढणी झाली व रब्बी हंगामाची सुरुवात झाली असून यामध्ये लागण्राया अवजारांचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे बदलत्या जीवनशैलीमुळे बलुतीदारांची सध्याची पिढी धान्याच्या मोबदल्यात काम करण्यास तयार नसल्याने पूर्वपार चालत आलेली बलुतेदार पद्धत कालबाह्य होऊ लागली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या पूर्वीच्या अनेक पद्धतीला गरगर लागले असून कामाच्या बदल्यात धान्य ऐवजी पैशाच्या स्वरूपात मोबदला घेऊन जाऊ लागल्याने बलुतेदारामध्ये व्यावसायिकता आल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे
पूर्वी ग्रामीण भागात बारा बलुतेदार व 18 आलुतेदार यामध्ये व्यवहार चालायचा बारा बैत्यांची परंपरा चालत असे अन्य कामातून सण समारंभासाठी वापरण्यात येण्राया वस्तूची देवाण-घेवाणासाठी वेळ मिळत नसल्याने बलुतेदारी अस्तित्वात आली वर्षातील किती व साजऱ्या होणाऱ्या सणाला मातीपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंच्या मोबदल्यात कुंभार बांधवांना धान्य दिले जायचे सध्या ग्रामीण भागात जवळजवळ बारा बलुतेदार पद्धत बंद होत आहे. धान्य देऊन शेती अवजारे करून घेण्याची पद्धत लोप पावत चालले असून सध्याच्या आधुनिकतेच्या यंत्रात तंत्रज्ञानावर आधारित शेती केली जात आहे.
पूर्वीच्या शेतीला उत्तम दर्जाचा व्यवसाय म्हणून मान्यता होती. शेती कामासाठी धान्य देऊन सुगीची कामे करून घेतली जात होती. तसेच शेतीच्या मशागतीसाठी लागणारी अवजारे बनवणे त्याची डागडुजी करणे ही कामे बलुतेदारांच्या करवी करून घेतली जात होती. त्यांच्या मोबदल्यात त्यांना खरीप हंगामाची सांगता झाल्यावर पैसाऐवजी धान्य दिले जात होते. नागपंचमी गौरी गणपती बेंदूर दसरा आधी सणांमध्ये लागणारे मातीचे नागोबा मातीची बैल जोडी मातीचा घट हे कुंभार बांधवाकडून तर सुतार लोहारकडून वर्षभर लागणाऱ्या शेतीची अवजारे धान्याच्या स्वरूपात मिळायची. पण काळ बदलला आता आधुनिक तंत्रज्ञानाने जागा घेतली निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती बेभरवशाची झाली असल्याने पारंपारिक शेतीही कमी झाली आहे. त्यामुळे माळी सुतार लोहार चर्मकार कुंभार बुरुड आधी बारा बलुतेदारांची मोठी अडचण झाली आहे त्यामुळे त्यांच्या वस्तूची मागणी ही घटली आहे.
ग्रामीण भागात काही गावांमध्ये बलुतेदार पद्धत आहे. मात्र अशा बलुतेदारांच्या वरील सध्या बेरोजगाराची कुराड कोसळली आहे. सुतार बांधवाकडून शेतीसाठी मिळणारे लाकडे साहित्य हे आता बाजारात रेडिमेड स्वरूपात मिळत असल्याने आणि सुतार यांच्याकडून मिळणारी अवजारे थोडी महाग झाले असल्याने त्याचबरोबर नव्या पिढीने इकडे पाठ फिरवल्याने ही पद्धत बंद होण्याच्या मार्गावर आहे.
विलास सुतार, करगीर