ऑटो निर्देशांक 1 टक्का वधारला
06:43 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
गेल्या आठवड्याभरामध्ये निफ्टी ऑटो निर्देशांक चांगलाच तेजीत असलेला पहायला मिळाला. आठवड्याभरात ऑटो निर्देशांक 5.4 टक्के इतका वधारलेला दिसला. या तुलनेमध्ये निफ्टी-50 निर्देशांक केवळ 1.7 टक्के वधारला होता. सोमवारी एनएसईवर ऑटो निर्देशांक 1 टक्का वाढत 29095 या विक्रमी स्तरावर पोहोचला होता. मारुती सुझुकी, आयशर मोटर्स या कंपन्याच्या समभागाने नवी विक्रमी झेप घेतली होती. मारुतीचा समभाग 17325 रुपये व आयशरचा समभाग 7499 रुपयांवर पोहोचला होता.
Advertisement
Advertisement