For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अधिकाऱ्यांना बोलावले, पण चर्चेविनाच परतले!

05:02 PM Jan 08, 2025 IST | Radhika Patil
अधिकाऱ्यांना बोलावले  पण चर्चेविनाच परतले
Advertisement

सांगली : 

Advertisement

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सांगलीकरांना कवलापूर विमानतळाचे दाखवलेले ‘गाजर’ अद्यापही शासन स्तरावर तसेच आहे. सोमवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीसाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले. पण कवलापूर वगळता अन्य विमानतळाबाबतच निर्णय झाले. त्यामुळे पुन्हा एकदा सांगलीकरांच्या पदरी निराशा आली असून शासनाच्या या अनास्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी झालेल्या कवलापूर विमानतळ बचाव कृती समितीच्या बैठकीत शासनाचा निषेध करण्यात आला.

कवलापूर विमानतळाबाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी अन्यथा कवलापूर विमानतळाच्या जागेवर आंदोलन करण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून कवलापूर विमानतळाचा प्रश्न गाजत आहे. या जागेवर विमानतळ होण्यासाठी सांगलीकरांनी अनेक आंदोलने केली. काही दिवसांपूर्वी ही जागा अन्यत्र वर्ग करून हडपण्याचाही प्रयत्न झाला. पण सांगलीकरांनी हाणून पाडला.

Advertisement

दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला सांगलीचे जिल्हाधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांच्यासह संबधित अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे विमानतळाबाबत पुन्हा आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु सांगली वगळता राज्यातील अनेक विमानतळांच्या विकासाबाबत चर्चा आणि निर्णय झाले. राज्यातील विमानतळ विकसीत करणे तसेच आवश्यक त्या सुधारणा करण्यावर चर्चा झाली. कवलापूर विमानतळाबाबत काहीच निर्णय अथवा चर्चा न झाल्याने नाराजी पसरली आहे.

कवलापूर विमानतळ बचाव कृती समितीचा आंदोलनाचा इशारा

कष्टकऱ्यांची दौलत येथे कवलापूर विमानतळ बचाव कृती समितीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत शासनाच्या अनास्थेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्यातील सर्व ा†वमानतळ ा†वका†सत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र आपल्या सांगली ा†जह्यातील कवलापूर ा†वमानतळ ा†वका†सत करण्यासाठी किंवा भूमी संपादन करण्यासाठी साधी चर्चा सुद्धा करण्यात आली नाही. फ‹ ा†नवडणुकीच्या वेळेला गाजर दाखवायची भाषणे करायची परंपरा अखंड चालू रा†हलेली आहे. ा†जह्यातील नागा†रकांच्या वतीने राज्य व केंद्र सरकारचा या बैठकीत निषेध करण्यात आला.

कवलापूर ा†वमानतळ बाबत सकारात्मक चर्चा करून कार्यवाही चालू करावी अन्यथा आम्हाला कवलापूर ा†वमानतळ जागेवर आंदोलन करावे लागेल. असा इशारा देण्यात आला. या बैठकीस सतीश साखळकर, माजी आ ा†नतीन शिंदे ,पद्माकर जगदाळे, हनमंत पवार, उमेश देशमुख, बजरंग पाटील, शंभूराज काटकर, महेश खराडे, उदय पाटील, मयूर बांगर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.