For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाचव्या दिवशीच्या दौडमध्ये देखाव्यांचे आकर्षण

10:40 AM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाचव्या दिवशीच्या दौडमध्ये देखाव्यांचे आकर्षण
Advertisement

अनगोळ परिसरात जल्लोषात स्वागत : बालक-महिलांचा उदंड प्रतिसाद : जिवंत देखावे ठरताहेत लक्षवेधी

Advertisement

बेळगाव : पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज, भगव्या पताका, भगवे फेटे आणि ठिकठिकाणी सादर झालेल्या जिवंत देखाव्यांमुळे सोमवारी टिळकवाडी, अनगोळ परिसरात दुर्गामाता दौड अभूतपूर्व उत्साहात पार पडली. हजारो धारकऱ्यांसह बालक आणि महिलांचाही उदंड प्रतिसाद मिळाला. दौड मार्गावर आकर्षक रांगोळ्या, स्वागत कमान, पुष्पवृष्टी, ध्वजपूजन करून जागोजागी उत्साहात स्वागत झाले. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ आणि मावळ्यांच्या वेशभूषेतील बालकांनी सर्वांचे लक्ष वेधले. पाचव्या दिवशीच्या दौडला श्री शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथून प्रारंभ झाला. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन आणि आरती करून दौडला चालना देण्यात आली. टिळकवाडी पोलीस स्थानकाचे सीपीआय परशराम पुजारी आणि माजी सैनिक शिवाजी कंग्राळकर यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला.

गणपत गल्ली, अनगोळ

Advertisement

गणपत गल्ली, अनगोळ येथे पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या रुढी-परंपरांचे जतन करणारे देखावे सादर करण्यात आले. दौड मार्गावर या देखाव्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले. सामाजिक संदेशांचे फलक घेऊन बालकही यामध्ये सहभागी झाले होते.

बाबले गल्ली, अनगोळ

बाबले गल्ली, अनगोळ येथे हिंदू सणांचा देखावा सादर झाला. रक्षाबंधन, गुढीपाडवा, वटपौर्णिमा, दिवाळी, गणेशोत्सव आदी सणांचे महत्त्व विशद करणारे देखावे महिलांनी सादर केले. त्याबरोबरच विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वरी वाचन आणि वारकरी सांप्रदायातील भजनाचा देखावाही आकर्षण ठरला.

महिलांचा उत्साह

दौड मार्गावर वेगवेगळे जिवंत देखावे सादर करण्यासाठी महिलांचा उत्साह अधिक होता. विशेष वेशभूषा करून महिलांनी सहभाग दर्शवला. बालकही शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये दिसून आले. पाचव्या दिवशीच्या दौडला शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथून प्रारंभ होऊन एम. जी. रोड, महर्षी रोड, नेहरू रोड, पहिले रेल्वेगेट, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, देशमुख रोड, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, गोवावेस स्वीमिंग पूल, सोमवार पेठ, देशमुख रोड, आरपीडी क्रॉस, खानापूर रोड, अनगोळ क्रॉस, अनगोळ रोड हरिमंदिर, चिदंबरनगर, हादूगिरी, विद्यानगर, एस. व्ही. रोड, कुरबर गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, भांदूर गल्ली, सुभाष गल्ली, हणमण्णावर गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्ली, नाथ पै नगर, बाबले गल्ली, रघुनाथ पेठ, कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली येथून महालक्ष्मी मंदिरात सांगता झाली.

उद्याचा दौडचा मार्ग

नेहरूनगर येथील बसवाण्णा मंदिरपासून प्रारंभ होणार आहे. सदाशिवनगर पहिला मेन दुसरा क्रॉस, सदाशिवनगर सेकंड मेन चौथा क्रॉस, हरिद्रा गणेश मंदिर रोड, आंबेडकर गल्ली, गणेश चौक, मरगाई मंदिर, सदाशिवनगर पहिला आणि चौथा क्रॉस, तिसरा क्रॉस, दुसरा क्रॉस, नेहरूनगर तिसरा क्रॉस, रामदेव हॉटेल, गँगवाडी, दुर्गामाता रोड, रामनगर, अशोकनगर, सुभाषनगर, जोतिबा देवस्थान येथून शिवबसवनगरमध्ये सांगता होणार आहे.

Advertisement
Tags :

.