महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जम्मूत घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला

06:55 AM Dec 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोळीबारात एका घुसखोराचा खात्मा, तिघांचे पलायन

Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू

Advertisement

जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये लष्कराने घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर तो भारतीय लष्कराने उधळला. लष्कराच्या जवानांनी चार घुसखोरांना आंतरराष्ट्रीय सीमेवरून पुंपणाकडे येताना पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात एक घुसखोरही ठार झाला असून त्याचा मृतदेह दहशतवाद्यांनी ओढून नेला आहे. भारतीय लष्कराने योग्यवेळी चोख प्रत्युत्तर देताच तीन घुसखोरांनी पलायन केले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून पूर्ण पाठिंबा मिळत होता. हे घुसखोर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात घुसण्याच्या प्रयत्नात होते. याचदरम्यान भारतीय जवानांचे लक्ष वळवण्यासाठी पाकिस्तानी लष्करानेही आपल्या एका चौकीला आग लावली. मात्र, पाकिस्तानचा हा डाव यशस्वी झाला नाही. जवानांनी लगेचच घुसखोरांवर गोळीबार केल्यानंतर एक घुसखोर मारला गेला.

भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी घुसखोरीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांनी शनिवारी पहाटे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अखनूर सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून चार शस्त्रसज्ज दहशतवादी भारतीय हद्दीत येताना दिसले. त्यानंतर सैनिकांनी घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांवर गोळीबार करताच एका दहशतवाद्याला गोळी लागली आणि तो जमिनीवर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह त्याच्या साथीदारांनी आंतरराष्ट्रीय सीमेच्या पलीकडे ओढून नेल्याचे स्पष्टपणे दिसून आल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सदर दहशतवादी रात्रीच्या अंधारात टेहळणी यंत्राद्वारे घुसखोरी करताना दिसल्याचेही सांगण्यात आले.

पूंछमधील चकमकीत तीन मृतदेह हाती

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. लष्कराच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर दहशतवादी आणि  सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. या संघर्षात हल्ल्याच्या ठिकाणाहून तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. सदर मृतदेहांविषयी अधिक तपास सुरू आहे. संबंधितांचा मृत्यू कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article