Kolhapur : अंबाबाई मंदिराचा परिसर भाविक-पर्यटकांनी गजबजला
भाविकांची रिमझिम पावसातही अंबाबाई दर्शनाची ओढ
कोल्हापूर : दिवाळी सुट्टी व शनिवार- रविवारच्या सुट्ट्या आणि आगामी स्थानिक स्वंराज्य संस्थध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी मतदारांना सहलींवर पाठवल्यामुळे करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविक व पर्यटकांची रविवारी मोठी गर्दी झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या रिमझिम पावसातही भाविकांची गर्दी कायम होती. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन देवस्थान समितीकडून दर्शन रगित आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच पोलिस आणि वाहतूक विभागाकडूनही शहरातील गर्दीदर नियंत्रण ठेवत वाहतुकीची योग्य व्यवस्था करण्यात आली होती.
अंबाबाई मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. देवदर्शन घेतल्यानंतर भाविकांनी रंकाळा, जोतिबा, न्यू पॅलेस आदी पर्यटनस्थळांवर गर्दी केली होती. भवानी मंडप आणि दसरा चौक परिसरात पाकिंगची अडचण जाणवली. काही पर्यटकांनी वाहने थांबवल्याने रस्त्यातच वाहतुकीची कोंडी झाली