For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्री अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व खात्याचे अधिकारी अंबाबाई मंदिरात दाखल

11:19 AM Mar 14, 2024 IST | Abhijeet Khandekar
श्री अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व खात्याचे अधिकारी अंबाबाई मंदिरात दाखल
Sri Ambabai temple
Advertisement

पाहणीचा अहवाल जिल्हा सत्र न्यायालयात सादर करणार

कोल्हापूर

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाला धोका निर्माण झाल्याची आणि मूर्तीच्या अनेक भागात झीज झाली असल्याची धक्कादायक माहिती गेल्या काही महिन्यांपूर्वी समोर आली होती.

Advertisement

गेल्या अनेक वर्षांपासून अंबाबाईच्या मूर्तीवर पुरातत्व खात्याकडून वज्रलेप व रासायनिक प्रक्रिया करून मूर्ती संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत असून मूर्तीची अवस्था अत्यंत नाजूक असून मूर्ती संवर्धनाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली होती. यामुळे मूर्तीचे तातडीने संवर्धन करावे. अन्यथा पुरातत्त्व खात्याच्या निवृत्त तज्ञांकडून मूर्तीचे संवर्धन करून घेण्यास परवानगी मिळावी. तसेच मूर्तीची अवस्था आज नेमकी काय आहे. हे ठरवण्यासाठी तज्ञ लोकांना पाहणीसाठी नेमावे असे मागणी श्री पूजक गजानन मुनीश्वर यांनी 21 मार्च 2022 मध्ये न्यायालयाकडे केला होता. या संदर्भात न्यायालयाने विलास मांगीराज व आर. एस. त्र्यंबके या पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करावी. तिच्या सध्या परिस्थितीबद्दल व संभाव्य उपाययोजनाबद्दल अहवाल सादर करावा असा आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आज सकाळी पुरातत्व खात्याचे दोन निवृत्त अधिकारी अंबाबाई मंदिरात दाखल झाले असून श्री अंबाबाई देवीच्या मुर्तीची पाहणी करण्यात येत आहे. या पाहणीचा अहवाल लवकरच जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

मूर्ती संवर्धन नियमानुसार न केल्याने त्रुटी समोर
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आणि लाखो भक्तांची आई श्री करवीर निवासिनी अंबाबाई ची प्रकृती नाजूक झाली आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक रोज कोल्हापुरात येत असतात. आईचं एक रूप पाहण्यासाठी हे सर्व भक्त तासांचाच रांगेत उभारतात. मात्र अंबाबाईच हे रूप आणि सौंदर्य कमी होत असल्याची धक्कादायक माहिती काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. अंबाबाईची मूर्ती ही प्राचीन काळातील असल्याने आता त्याची झीज होत आहे. या मूर्तीवर पुरातत्त्व खात्याकडून 1955 साली वज्रलेप करण्यात आला होता. मात्र हा वज्रलेप गळून पडल्याने व मूर्तीची अवस्था पुन्हा नाजूक झाली. यामुळे महाराष्ट्र शासनाने 1999 साली पुन्हा वज्रलेप करण्याचा निर्णय घेतला. त्याला अनेकांनी विरोध दर्शवल्याने व न्यायालयात गेल्याने 2015 साली पुरातत्त्व खात्याने मूर्तीचे रासायनिक संवर्धन करावे असे ठरले. त्याप्रमाणे राज्य व केंद्रीय पुरातत्व खात्याच्या मदतीने 2015 मध्ये मूर्तीचे रासायनिक संवर्धन केले. मात्र या संवर्धनातील त्रुटी लगेचच दिसून यायला सुरुवात झाल्या. सदर संवर्धनाचे काम पुरातत्व खात्याने एकाही गोष्टीचे पालन न करता केल्याने मूर्ती आता अधिकच जीर्ण होऊ लागली असल्याचे श्री पूजकांच्या वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले होते. तसेच अशा परिस्थितीमध्ये श्रीपूजक व देवस्थान व्यवस्थापन समिती हे दोन्ही घटक मूर्तीच्या नेहमी जवळ असल्याने चिंतेत होते.

Advertisement

पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकार्यांची नियुक्ती :
यामुळे मूर्तीची अवस्था आज नेमकी काय आहे? हे ठरवण्यासाठी तज्ञ लोकांना पाहणीसाठी नेमावे मागणी अशी श्री पूजक गजानन मुनीश्वर यांनी 21 मार्च 2022 मध्ये दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे केली होती. यावर सुनावणी पार पडली होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती बरोबरच जिल्हा प्रशासन, राज्य पुरातत्व विभाग, केंद्रीय पुरातत्व विभाग यांना प्रतिवादी करण्यात आले. तर ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर व सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई हे प्रतिवादी म्हणून हजर झाले आहेत. तर सर्व प्रतिवादींना नोटीस लागू झाल्याने जिल्हा प्रशासन व देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने दाव्यासाठी कैफियत व प्रत्येक अर्जावर म्हणणे दाखल करण्यात आले होते. यावर न्यायाधीश व्ही. डी. भोसले यांनी 21 फेब्रुवारी 2024 रोजी सुनावणी पूर्ण केली. आणि पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी मांगीराज व आर एस त्र्यंबके यांनी मूर्तीची पाहणी करून तिच्या सध्या परिस्थितीबद्दल व संभाव्य उपाययोजना बद्दल 4 एप्रिल 2024 पर्यंत न्यायालयाला अहवाल सादर करावा असा आदेश पारित केले होते. त्यानुसार आज सकाळी 7 वाजल्याच्या सुमारास करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व खात्याचे दोन निवृत्त अधिकारी तसेच याचिकाकर्ते आणि प्रतिवादी ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर व सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई अंबाबाई मंदिरात दाखल झाले. सध्या या मूर्तीची पाहणी करण्याचे काम सुरू आहे. या दोन समिती सदस्य पाहणीचा अहवाल कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाला लवकरच सादर करण्यात येणार असून समिती अहवाल काय देणार आणि अंबाबाई मूर्ती संवर्धन करण्यासाठी नेमकं कोण कोणत्या उपाययोजना सुचवणार याकडे अंबाबाई देवीच्या भक्तांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Tags :

.