For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवारमधून म. ए. समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांचा अर्ज दाखल

10:20 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारवारमधून म  ए  समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांचा अर्ज दाखल
Advertisement

आजअखेर एकूण दहा उमेदवारी अर्ज दाखल

Advertisement

कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज सोमवारी दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन उदयसिंग सरदेसाई यांच्या उमेदवारी अर्जाचा समावेश आहे. सरदेसाई उमेदवारी अर्ज दाखल करताना खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, रमेश धबाले, गोपाळ पाटील आणि बळीराम शेलार उपस्थित होते. सरदेसाई यांच्या व्यतिरिक्त चिदानंद एच., हरिजन आणि कृष्णाजी पाटील (दोघेही अपक्ष उमेदवार) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आजअखेर कारवार लोकसभा मतदार संघातून सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल असून 20 तारखेला उमेदवारी अर्जांची छानणी तर अर्ज पाठीमागे घेण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल आहे. 7 मे रोजी निवडणूक होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.