बेंगळुरात ड्रग्जविरोधी मोहीम तीव्र
अडीच कोटींचे ड्रग्ज जप्त : विदेशी नागरिकासह दोघांना अटक
प्रतिनिधी/ बेंगळूर
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ड्रग्जविऊद्धची मोहीम तीव्र करणाऱ्या सीसीबी पोलिसांनी एका विदेशी नागरिकासह दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून 2.50 कोटी ऊपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. नायजेरियाचा ओके क्रिस्टोफर (वय 45) आणि तामिळनाडूच्या एचएसआर लेआऊट येथील नवीन राज (वय 26) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत, अशी माहिती बेंगळूर शहर पोलीस आयुक्त सीमंत कुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटक केलेल्या ड्रग्ज तस्करांकडून अडीच कोटी रुपये किमतीचे 1 किलो 70 ग्रॅम एमडीएमए क्रिस्टल, 60 एक्सटीसी गोळ्या, 100 एलएसडी स्ट्रिप्स, 5 ग्रॅम कोकेन, 2 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप आणि 2 लाख ऊपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. सोलदेवनहळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत ओके क्रिस्टोफर नावाच्या नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून 1 किलो 70 ग्रॅम एमडीएमए क्रिस्टल, 60 एक्सटीसी गोळ्या, 2 लाख रोख रक्कम, मोबाईल फोन, 1 लॅपटॉप आणि 2.25 कोटी किमतीच्या इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
गेल्या वषी बिझनेस व्हिसावर अटक केलेला विदेशी नागरिक भारतात आला होता. त्याने दिल्ली आणि मुंबईत राहणाऱ्या विदेशी नागरिकांकडून कमी किमतीत एमडीएमए खरेदी केले होते. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या ओळखीच्या लोकांना पुरवण्याची तयारी तो करत होता. त्याच्याविऊद्ध सोलदेवनहळ्ळी पोलीस ठाण्यात यापूर्वी एनडीपीएस गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान, सुटकेनंतर तो पुन्हा ड्रग्ज तस्करीत सहभागी झाला. त्याच्याविऊद्ध सोलदेवनहळ्ळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.