महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सरमळे नजिक नेवली ग्रामदैवत माऊलीचा वार्षिक उत्सव उद्यापासून

11:50 AM Dec 07, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

हरिनाम सप्ताहासह वार्षिक जत्रोत्सव

Advertisement

ओटवणे |प्रतिनिधी

Advertisement

सरमळे नजीक नेवली गावचे ग्रामदैवत येथील श्री देवी माऊली मंदिरात शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी हरिनाम सप्ताह तर माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी १० डिसेंबर रोजी होत आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी महती असलेल्या माऊलीच्या या वार्षिक उत्सवात हजारो भाविक नतमस्तक होतात.

शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी सात प्रहाराच्या हरीनाम सप्ताहाला विधिवत प्रारंभ झाल्यानंतर नेवली परिसरातील भजन मंडळे आपली सेवा माऊली चरणी अर्पण करणार आहेत. या हरिनाम सप्ताहाची सांगता दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाने होणार आहे . रविवारी १० डिसेंबर रोजी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव होणार आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकी नंतर जय हनुमान दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानच्या सर्व मानकऱ्यांनी आणि नेवली ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement
Tags :
tarun bharat news
Next Article