महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘डेक्सटर’च्या नव्या सीझनची घोषणा

06:45 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगाचा सर्वात पसंतीचा सीरियल किलर डेक्सटर पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. स्वत:चा अभिनेता मायकल सी हॉलने याची घोषणा कॉमिक-कॉन 2024 दरम्यान केली आहे. डेक्सटर पुन्हा कधी स्वत:च्या जगात परतेल अशी अपेक्षा डेक्सटरच्या चाहत्यांना देखील नव्हती. परंतु सॅन दिएगो येथे सुरू असलेल्या कॉमिक-कॉन 2024 मध्ये डेक्सटरच्या निर्मात्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

Advertisement

अभिनेता मायकल सी हॉलने डेक्सटर या सीरिजमध्ये मॉर्गन ही व्यक्तिरेखा साकारली होती. लवकरच हा पसंतीचा शो प्रेक्षकांच्या भेटीला परत येणार असल्याचे मायकलने सांगितले आहे. पुढील वर्षी मायकल सी हॉल पुन्हा एकदा डेक्सटरच्या व्यक्तिरेखेत स्वत:चा नवा शो ‘डेक्सटर : रिजरेक्शन’मधून परतणार आहे.

Advertisement

डेक्सटरचा प्रीमियर 2006 साली झाला होता. या सीरिजमध्ये मायकल हा मॉर्गनच्या भूमिकेत दिसून आला होता. ही भूमिका एका सीरियल किलरची होती. प्रेक्षकांची मने जिंकणारा हा पहिला सीरियल किलर ठरला होता. हा शो आठ सीझनपर्यंत चालला होता. डेक्सटर आजही डार्क बेस्ट सीरियल किलरच्या श्रेणीत मोडतो.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article