कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाफोली माऊली मंदिराचा वर्धापन दिन १२ मे रोजी

05:17 PM May 11, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

प्रतिनिधी
बांदा
वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक 12 मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता प्रायश्चित्त विधी त्यानंतर यजमानांची शरीरशुद्धी,सर्व देवतांचे आवाहन,देवता प्रार्थना,गणपती पूजन,पुण्याहवाचन, संभारदान, आचार्यवरण, प्राकारस्थलशुद्धी, देवतास्थापना,श्री देवी माऊली व परिवार देवतांचे पूजन,अग्नीस्थापन,वास्तु हवन,ग्रहयज्ञ, श्रीदेवी माऊली व परिवार देवतांचे हवन,तत्वहोम, बलिदान,पूर्णाहुती, अभिषेक,देवतांना महानैवद्य,आरती, देवता प्रार्थना, आशीर्वाद, तीर्थप्रसाद सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता स्थानिकांची सुश्राव्य भजने,रात्रौ ९ वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळ यांचे दणदणीत दशावतारी नाटक होणार आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी तसेच नाट्य प्रेमींनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष विलास गवस, प्रमुख मानकरी, वाफोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था,मुंबई व वाफोली ग्रामस्थ यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article