For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

. अमेरिका-आयएसआयचे देशातील बांगलादेशी कनेक्शन !

06:06 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
  अमेरिका आयएसआयचे देशातील बांगलादेशी कनेक्शन
Advertisement

देशाचे तुकडे करण्यासाठी अमेरिका-पाकिस्तानी आयएसआय आणि डिप स्टेट सरसावले आहेत. यासाठी त्यांनी आधार घेतला आहे तो बांगलादेशचा. ज्या बांगलादेशाची निर्मिती भारताने केली. त्या बांगलादेशातील मोहम्मद युनुस सारख्या पोपटाला हाताशी घेत अमेरिका आणि आयएसआयने भारतावर आगपाखड करण्यास सुऊवात केली आहे. देशात अस्थिरता माजविण्यासाठी अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी देखील त्यांचे कनेक्शन असून, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

संपूर्ण जगावर आपले वर्चस्व ठेवायचे ही मनिषा पहिल्यापासून अमेरिकेची आहे. कोणते ना कोणते कारण देत वेळोवेळी त्यांनी इतर देशांवर आक्रमण करत त्यांचा ताबा घेतला आहे. मात्र यातील एकाही देशामध्ये अमेरिका यशस्वी झाली नाही. ज्या आक्रमकपणे इतर देशांचा ताबा घेतला. त्याच नामुश्कीने त्यांना तेथून पळ काढावा लागल्याचा इतिहास आहे. अगदी अफगाणिस्तानमध्ये देखील अमेरिकेने सपाटून मार खात ताबा सोडला. ज्या तालिबानचे नामोनिशान मिटविण्यासाठी एवढा आटापिटा केला त्याच तालिबानच्या कारवायांनी त्रस्त होत त्यांनी अफगाणिस्तानातून पळ काढला. यामुळे अफगाणिस्तान पुन्हा एकदा तालिबानच्या ताब्यात आला. तर आता त्यांना व्हेनेझुएलाचा ताबा घेतल्यानंतर बांगलादेशचा ताबा घ्यायचा आहे. मात्र बांगलादेशचा ताबा घेणे एवढे सोपे नाही, हे अमेरिका देखील ओळखून आहे. यामुळे गेल्या वर्षभरापासून त्यांनी बांगलादेशात अराजकता माजविण्यास सुऊवात केली आहे. बांगलादेश हा भारताने स्वतंत्र केलेला देश आहे. यामुळे भारताची बांगलादेशावर मजबुत पकड असल्याची जाणीव अमेरिकेला आहे. बांगलादेशातील राजकीय वर्तुळात काय सुऊ आहे आणि कोणामुळे सुऊ आहे याची इत्त्यंभुत माहिती भारतातील सत्ताधाऱ्यांना असल्याचे अमेरिकेला माहीत आहे. यामुळे बांगलादेशातून भारताचे वर्चस्व कमी करायचे असेल तर बांगलादेशात भारतविरोधी वातावरण तयार करायचे. तर पाकिस्तानी आयएसआयला हाताशी घेत भारतातील बांगलादेशी नागरिकांना अथवा या ठिकाणी पाठविलेल्या हेरांना देशात अस्थिरता माजविण्यासाठी सक्रिय करण्याची कुटनिती आखली आहे.

यासाठी त्यांनी मोहम्मद युनुस नावाचा पोपट देखील तयार केला आहे. होय तोच मोहम्मद युनुस जो नोबल पारितोषिक विजेता आहे. मात्र हे नोबल पारितोषिक मिळविण्यासाठी अथवा त्याच्या ग्रामीण बँक संकल्पनेला पहिल्यापासून कोणी मदत केली? हे तो विसरला आणि अमेरिकेने टाकलेल्या तुकड्यासाठी जीभ हलवित तो त्यांच्या तालावर नाचायला लागला. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि नुकतेच बांगलादेशात मृत्यूदंडाची शिक्षा ठोठाविलेली शेख हसीना ही भारताच्या तालावर नाचणारी असल्याचा प्रपोगंडा अमेरिका आणि पाकिस्तानी आयएसआयने मोहम्मद युनुसच्या माध्यमातून तयार केला. तो येथील तरूणांमध्ये खास कऊन बेरोजगार तरूणांमध्ये पसरवून हिंसक आंदोलन घडवून आणले. त्यानंतर हिंदुंवर अत्याचार करण्यास भर दिवसा त्यांना जिवंत जाळण्यास सुऊवात केली. हे सर्व अमेरिकेच्या सीआयए आणि पाकिस्तानी आयएसआयने सुऊ केले. एवढेच नाही तर या हिंसाचारात स्वत:ची पोळी भाजण्यासाठी अमेरिकेतील डिप स्टेटने देखील उडी घेतली. आमच्या वाचकासाठी डिप स्टेट म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल. डिप स्टेट म्हणजे एक गुप्त नेटवर्क जे इतर देशातील सरकारी धोरणावर प्रभाव टाकण्यासाठी आणि त्याची अमलबजावणी करण्यासाठी अवैधरित्या काम करते. यामध्ये भल्या-भल्या व्यक्तींचा समावेश असतो. याला डिप स्टेट म्हणतात.

Advertisement

बांगलादेशात अराजकता माजवून त्याचे लोण भारतात देखील पसरविण्यासाठी खास कऊन देशाच्या सेव्हन सिस्टर्स म्हणजे आसाम, अऊणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम या राज्यात पसरवून त्या वेगळ्या करण्याचा कट आखण्यात आला.

एवढेच नाही तर त्याप्रकारच्या घोषणांनी बांगलादेशात गरळ ओकण्यास देखील सुऊवात झाली. या सात राज्यांना जोडणाऱ्या चिकन नेकला (पश्चिम बंगाल आणि सात राज्यांना जोडणारा 22 किमीचा रस्ता त्याला चिकननेक संबोधले जाते) टारगेट करण्यासाठी कुटनिती आकार घेतल्याची भणक लागताच भारताने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख केली. एवढेच नाही तर देशांचे पंतप्रधान यांची हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न देखील चीनमध्ये झाला. यामध्ये अमेरिकेच्या सीआयए आणि पाकिस्तानची आयएसआयचा हात होता. मात्र मोदी नितीला या दोन्ही एजन्सीने ओळखण्यात चुक केली आणि त्यांच्यावरच सर्व काही बुमरँग झाले. या कटात अयशस्वी झाल्याने नामुश्की ओढावलेल्या अमेरिका-आयएसआयने देशातील बांगलादेश नागरिक जे अवैधरित्या राहत आहेत ज्यांच्यावर बांगलादेशात गुन्हे दाखल आहेत, अशांना हाताशी घेत देशात अस्थिरता माजविण्याचा कट आखण्यास सुऊवात केली आहे.

मात्र देशातील अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींवर स्थानिक पोलीस आणि तपास यंत्रणांची करडी नजर असल्याचे या एजन्सी विसरल्या आहेत. तरीही त्यातूनही सीआयए-आयएसआय शांत बसणाऱ्यातल्या नाहीत. यामुळे देशातील बांगलादेशी नागरिकांना वेळीच शोधून त्यांना बांगलादेशात हाकलले पाहिजे. आजही राज्यातील मुंबई, पुणे सारख्या प्रमुख शहरात अनेक बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत आहेत. यापूर्वी देशात अनेक बांगलादेशी नागरिकांना हेरगिरी करताना अटक केली आहे. तसेच देशातील तपास यंत्रणांनी आयएसआयचे देशातील एक रॅकेटच उद्धवस्त केले आहे. आयएसआयसाठी काम करणाऱ्यांमध्ये  दिल्लीतील महाविद्यालयात शिकविणारा एका प्राध्यापकाचा देखील समावेश होता. हा प्राध्यापक मुळचा बांगलादेशी नागरिक असून, तो आयएसआयसाठी हेरगिरी करत असल्याचे समोर आले होते. दिल्लीतील संवेदनशील माहितीचा पुरवठा आयएसआयकडे जात होता. अशा प्रकारचे अनेक बांगलादेशी नागरिक खोट्या कागदपत्रांचा आधार घेत सरकारी मोठ्या पदावर असू शकतात तर काही खासगी क्षेत्रात देखील असू शकतात. यांचे सर्वांचे अमेरिका आणि पाकिस्तानी आयएसआयशी कनेक्शन असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याला वेळीच आळा घालणे आवश्यक आहे.

अमोल राऊत

Advertisement
Tags :

.