महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गुड्स वाहनाच्या धडकेने रुग्णवाहिका उलटली

11:24 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोघा रुग्णांसह पाच जण जखमी

Advertisement

बेळगाव : मोटारसायकल अपघातातील जखमींना इस्पितळात हलवताना गुड्स वाहनाची धडक बसून रुग्णवाहिका उलटली. शनिवारी रात्री इस्लामपूर रोडवरील चिक्कलदिन्नी क्रॉसजवळ झालेल्या या अपघातात रुग्णवाहिका चालकासह पाच जण जखमी झाले. सुशांत हरिजन (वय 17), बसवाणी हरिजन (वय 45), अमित हरिजन (वय 18), बाळाप्पा हरिजन (वय 37), सर्व राहणार हरणकोळ, रुग्णवाहिका चालक आनंद शिरगावी (वय 34) रा. यमकनमर्डी अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. सुशांत व अमित हे दोघे मोटारसायकल अपघातात जखमी झाले होते. त्यांना बेळगावला हलविण्यासाठी 108 रुग्णवाहिका मागवण्यात आली होती. रुग्णवाहिकेतून बेळगावला येताना चिक्कलदिन्नी क्रॉसजवळ गुड्स वाहनाची धडक बसल्यानंतर रुग्णवाहिका रस्त्याशेजारील शेतवडीत कलंडली. अपघातात आधीच जखमी झालेल्या दोघा जणांसह त्यांच्यासोबत निघालेले नातेवाईकही जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यमकनमर्डी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article