महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमरनाथ यात्रेची सांगता छडी मुबारकचा विधी संपन्न

06:20 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

52 दिवसांमध्ये 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन

Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू

Advertisement

अमरनाथ यात्रेची सोमवारी सांगता झाली आहे. 52 दिवसांपर्यंत चाललेल्या यात्रेत 5 लाखाहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेत बाबा बर्फानीचे दर्शन घेतले. 2023 मध्ये 4.5 लाख भाविक यात्रेत सामील झाले होते.

यात्रेच्या अखेरच्या दिवशी बाबा अमरनाथची पवित्र छडी मुबारक पंजतरणी येथून अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचली. छडी मुबारकच्या वैदीक मंत्रोच्चारादरम्यान पांरपरिक पूजा-विधी पार पडले. याचबरोबर अमरनाथ यात्रा 2024 ची सांगता झाली आहे.

बाबा अमरनाथची यात्रा 29 जून 2024 पासून सुरू झाली होती. याकरता जम्मूपासून बालटाल आणि नून (पहलगाम) बेस कॅम्पपर्यंत सुरक्षेची मोठी व्यवस्था करण्यात आली होती. कलम 370 हद्दपार होण्याच्या घटनेला 5 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 5 ऑगस्ट रोजी ही यात्रा एक दिवसासाठी रोखण्यात आली होती.

अमरनाथ यात्रेत भाविकांच्या संख्येत सलग दुसऱ्या वर्षी वाढ दिसून आली आहे. 2023 मध्ये 4.5 लाख तर यंदा 5 लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे. 2012 मध्ये उच्चांकी 6.35 लाख भाविकांनी दर्शन घेतले होते. 2022 मध्ये कोरोना संकटामुळे भाविकांचा आकडा कमी झाला होता आणि 3 लाख भाविक दर्शनासाठी पोहोचले होते.

मागील वर्षी अमरनाथ यात्रेत सुमारे 4.50 लाख भाविक सामील झाले होते. यंदा 6 लाख भाविक सामील होण्याची अपेक्षा होती. यात्रा 52 दिवसांपर्यंत चाली असून गर्दी अधिक असल्याने व्यवस्थाही मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. पूर्ण मार्गावर आहार, वास्तव्य आणि आरोग्य तपासणीसाठी व्यवस्था करण्यात आली होती. ऑक्सिजन बूथ, आयसीयू बेड, एक्स रे, सोनोग्राफी मशीन आणि लिक्विड ऑक्सिज प्लँटने युक्त दोन कॅम्प रुग्णालये स्थापन करण्यात आली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article