Shirol Farmer Story | अवघ्या ७ गुंठ्यांत पानमळ्याची किमया; रमेश मगदूम घेताहेत वर्षाला दीड लाखांचे उत्पन्न!
रमेश मगदूम यांची पानमळ्यातील यशोगाथा
शिरोळ - नागराळ ,(ता चिकोडी) येथील शेतकरी रमेश आप्पा मगदूम यांनी पारंपारिक शेतीकडे न करता प्रायोगिक तत्त्वावर अवघ्या सात गुंठ्यामध्ये पानमळ्याची लागवड केली असून वर्षाला दीड लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत . रमेश आप्पा मगदूम यांनी 2019 साली जवारी जातीचे पाच रुपये प्रमाणे 900 खाऊच्या पानाची रोपाची लागवड केली. याकरिता 15 हजार रुपये खर्च करण्यात आला होता.
चार फूट रुंद दोन फुट अंतरावर रोपे लावली. याकरिता शेणखत, मेंढरं बसविण्यात आली होती. रान भुसभुशीत करून वेळच्यावेळी त्याची निघा करण्यात आली. चार महिन्यात प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात झाली. 3000 पानाची एक करडी, (डप्पा) आठ ते दहा करडी खोडा करून सांगली जळगाव शेगाव चिकोडी कोल्हापूर पुणे मुंबई कराड श्रीरामपूर नाशिक. आधी शहरातील सौद्याला पाठवीत होते उत्कृष्ट पानाला चव असल्याने त्यांच्या पानाला चांगला दरही मिळत आहे. एका करडीच्या मागे खर्च जाऊन किमान 1500 ते 1800 रुपये मिळत असल्याचे मगदूम यांनी सांगितले. काही वेळेला खाऊच्या पानाचा दरही कमी मिळतो तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खाऊच्या पानाला चांगली मागणी असल्याने दरही चांगला मिळतो. एक वेळ गुंतवणूक केल्यावर किमान नऊ वर्ष पाणमळ्याचे उत्पन्न मिळत असते. खाऊच्या पानाची लांबी रुंदी व चव असल्याने अनेक व्यापारी थेट बांधावर येऊन जात आहेत.
रमेश हमगदूम यांनी यावेळी बोलताना सांगितले की सध्या पाण मळ्यामध्ये काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. पान मळ्यामध्ये पवित्रता राखावी लागते. पानाचा ावरविड्याला फार महत्त्व असते. आम्ही स्वतः वेळच्या वेळी त्याची निगा करणे खुडा करून सौद्यांला पाठवले जाते. या सात गुंठ्यामध्ये शेवगा लागवड केली आहे. यातुन चांगले उत्पादन मिळते. जनावरांना चारा मिळतो. गेल्या सात वर्षात खर्च वजा जाता किमान सात लाख रुपयेच उत्पादन घेतले आहे.अजुन दोन वर्ष पाणमळ्याचे उत्पन्न घेण्याचा मानस असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.