महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजपासून घरोघरी रंगणार...‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर!

01:15 PM Sep 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
Ganpati Bappa Morya
Advertisement

जिल्ह्यात 1,66,867 घरगुती तर 122 सार्वजनिक गणरायांची आज प्रतिष्ठापना; गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण

रत्नागिरी प्रतिनिधी

वर्षभरात ज्या क्षणाची लहानथोर सगळेजण अगदी चातकासारखी वाट पाहत असतात, तो क्षण आला आहे. गणपती बाप्पाचे आज जिल्हाभरात थाटामाटात आगमन होणार आहे. या आनंदाचा, उत्साहाचा, ऊर्जेचा आणि भक्तीचा महासागर मानलेल्या गणेशोत्सवात दंग होण्यासाठी सारे भाविक सज्ज झालेत. जिल्ह्dयात मोठ्या प्रमाणात चाकरमानीही दाखल झालेत. आज शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी जिल्ह्dयात 1 लाख 66 हजार 867 घरी तर 122 सार्वजनिक मंडळांमार्फत बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

Advertisement

सर्वांचे लाडके आराध्यदैवत विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची तयारी जवळजवळ पूर्णत्वाला गेली आहे. गणेशोत्सवाचा आणि त्या स्वागताचा सर्वत्र जोरदार माहोल झाला आहे. सारे भक्तगण बाप्पाचे आगमन आणि त्याच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी दंग झाले आहेत. रत्नागिरीत गणेश चित्रशाळांमधून लाडक्या गणपती बाप्पाला नेण्यासाठी साऱ्या भक्तांची जोरदार लगबग सुरू आहे. बाप्पाच्या आगमनाचा हा उत्सव यावर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी प्रत्येकजण आतूर झाला आहे.

Advertisement

आज शनिवारी घरोघरी गणरायाचे आगमन आणि प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गणेशभक्तांनी तर शुक्रवारपासूनच आदल्या दिवशी मूर्तीशाळेतून मूर्ती नेण्यास प्रारंभ केला. आजही दिवसभर गणरायाला घरी नेण्यात भक्तगण दंग राहणार आहेत आणि आज तर गणरायाचे भक्तीपूर्ण वातावरणात सर्वत्र आगमन होणार आहे. प्रत्येक घरी बाप्पाचे वाजत-गाजत आगमन होणार असून जिह्यात 1 लाख 66 हजार 867 घरी तर 122 सार्वजनिक मंडळांमार्फत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवासाठी प्रशासनासह पोलीस दलही सज्ज झाले आहे. घरच्या गणपती बाप्पासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतून चाकरमानी गावी येऊ लागले आहेत. प्रत्येक गावामध्ये कुठे आरती....भजने...अनेक ठिकाणी शक्तीवाले व तुरेवाले जाखडी डबलबारी तर काही ठिकाणी भजनांचे जंगी डबलबारीचे सामने रंगणार आहेत. अनेक ठिकाणी घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांकडूनही चलचित्र देखावे साकारले जात आहेत. रत्नागिरीमध्ये श्री रत्नागिरीचा राजा, रत्नागिरीचा राजा आठवडा बाजार, बंदर रोड मित्रमंडळ गणेशोत्सव, टिळक आळीतील सार्वजनिक गणेशोत्सव, शांतीनगरचा राजा, उद्यमनगरचा राजा तसेच सार्वजनिक बांधकाम, शासकीय ऊग्णालय, नगर परिषद, भूमी अभिलेख, पाटबंधारे, जिल्हा विशेष कारागृह अशा विविध कार्यालयांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाची जोरदार लगबग सुरू आहे.

जिल्ह्यात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या गणेशमूर्त्यांची संख्या:
पोलीस स्थानक खासगी सार्वजनिक
रत्नागिरी शहर 7,936 25
रत्नागिरी ग्रामीण 11,218 01
जयगड 2,708 05
संगमेश्वर 13,544 01
राजापूर 19,966 07
नाटे 7,279 03
लांजा 13,540 07
देवऊख 12,493 07
सावर्डे 10,240 01
चिपळूण 16,725 16
गुहागर 14,460 02
अलोरे 5,850 03
खेड 13,736 21
दापोली 6,335 09
मंडणगड 2,995 10
बाणकोट 653 02
पूर्णगड 5,690 01
दाभोळ 1,499 01

Advertisement
Tags :
Ganpati Bappa Moryaring in every house
Next Article