महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विमानतळ प्राधिकरणाने दीड कोटीचा कर थकविला

10:55 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सांबरा ग्रा. पं. कडे कर जमा करण्याची सूचना

Advertisement

बेळगाव : बेळगाव विमानतळ प्राधिकरणाने सांबरा ग्राम पंचायतीचा तब्बल 1 कोटी 50 लाख रुपयांचा कर थकविला आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगाव विमानतळाला ही रक्कम येत्या दोन दिवसांत ग्राम पंचायतीकडे भरण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे लवकरच हा थकीत कर सांबरा ग्राम पंचायतीला मिळणार आहे. सरकार आणि विमानतळ प्राधिकरणाच्या झालेल्या करारानुसार 2017 ते 2022 पर्यंत विमानतळाला करामध्ये सूट देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही विमानतळ प्राधिकरणाने ग्राम पंचायतीकडे कर जमा केलेला नाही. वार्षिक 50 लाख रुपये कर सांबरा ग्रा. पं. ला द्यावा लागतो. 2022 पासून थकविण्यात आलेला कर आता 1 कोटी 50 लाख रुपये झाला आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत सांबरा विमानतळाकडून ग्रा. पं. ला थकीत कराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ग्रा. पं. कडून वेळच्या वेळी सूचना करून देखील विमानतळ प्राधिकरणाने कर भरण्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी सांबरा ग्रा. पं. ची भेट घेऊन थकीत कराविषयीची माहिती घेतली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कर भरण्याच्या सूचना विमानतळ प्राधिकरणाला केल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article