महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शेतकऱ्यांच्या मुद्यावरून कृषिमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले

06:56 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यसभेत काँग्रेसवर हल्लाबोल : केंद्राच्या योजनांमुळे शेतकऱ्यांचा सन्मान वाढल्याची स्पष्टोक्ती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राज्यसभेत सोमवारी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवरून काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला. शिवराजसिंह यांनी राज्यसभेमध्ये विरोधकांवर संताप व्यक्त करताना ‘तुम्ही मला छेडले तर मी तुम्हाला सोडणार नाही’ अशा कडक शब्दात सुनावले. विविध राज्यात काँग्रेसची सत्ता असताना शेतकऱ्यांची हत्या झाली. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना अशा घटनांची पूर्ण जाणीव आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

राज्यसभेत कृषी मंत्रालयाच्या कामकाजावर सोमवारी चर्चा झाली. शुक्रवारी झालेल्या चर्चेदरम्यान अपूर्ण राहिलेले त्यांचे उत्तर पुढे घेऊन कृषिमंत्री चौहान यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीने केवळ लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच सशक्त केले नाही तर त्यांचा सन्मानही वाढवला आहे, असे स्पष्ट केले. चौहान उत्तर देत असताना काँग्रेसचे रणदीपसिंग सुरजेवाला यांनी त्यांना अनेकवेळा अडवण्याचा प्रयत्न केला आणि भाजप सरकारवर शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याचा आरोप केला. त्यावर ‘मी बोलताना मला रोखण्याचा प्रयत्न करू नका असे मी आधीच सांगितले होते. मला छेडले तर मी सोडणार नाही.’ असे कृषिमंत्री म्हणाले. तसेच त्यांनी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या कारकिर्दीसह मध्य प्रदेशातील विविध काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनांचा उल्लेख केला.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सभागृहात काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या गोळीबाराच्या घटनांची माहिती देताना सांगितले की, 1986 मध्ये बिहारमध्ये काँग्रेसचे सरकार असताना गोळीबारात 23 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. 1988 मध्ये इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीला दिल्लीत गोळीबार झाला होता, ज्यात दोन शेतकरी ठार झाले होते. 1988 मध्येच मेरठमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारात 5 शेतकरी मारले गेले होते. 23 ऑगस्ट 1995 रोजी त्यांच्या सरकारने हरियाणामध्ये केलेल्या गोळीबारात 6 शेतकरी मारले गेले. 19 जानेवारी 1998 रोजी मध्यप्रदेशातील मुलताई येथे शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्याने 24 शेतकरी मारले गेले, असा लेखाजोखाही कृषिमंत्र्यांनी मांडला.

शेतकऱ्यांचा ‘सन्मान’ काँग्रेसला खुपतोय!

काँग्रेसवर निशाणा साधताना कृषिमंत्र्यांनी आणखीही काही आरोप केले. किसान सन्मान निधीच्या माध्यमातून भाजपप्रणित सरकारने शेतकऱ्यांना थेट मदत सुरू केली. पण ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’सारखी योजना काँग्रेसने कधीच केली नाही. ही योजना आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवली होती. पण विरोधकांना ही योजना खुपतेय असे ते म्हणाले. देशातील छोट्या शेतकऱ्यांसाठी 6,000 ऊपयांची रक्कम महत्त्वाची आहे. या ‘किसान सन्मान निधी’मुळे शेतकरी स्वावलंबी व सशक्त झाला आहे. शेतकऱ्यांचा सन्मानही वाढला आहे. विरोधक शेतकऱ्यांबद्दल आदर दाखवत नाहीत, असेही कृषिमंत्री पुढे म्हणाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article