कराराने अदानींचे समभाग दौडले
06:19 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
भारत व अमेरिकेतल्या कराराची अखेर घोषणा झाल्याने शेअरबाजारात दमदार तेजी मंगळवारी दिसली. अदानी समूहातील बरेचसे समभाग मंगळवारी अगदी 13 टक्क्यांवर तेजीत राहताना दिसले आहेत. अदानी ग्रीन व अदानी एंटरप्रायझेसचे समभाग इंट्रा डेदरम्यान 13 टक्के इतके वाढले होते. अमेरिकेने भारतासोबतचा करार अंतिम केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम अदानी कंपन्यांच्या समभागांवर दिसला. अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पोर्टस व अदानी टोटल गॅस यांचे समभाग 6 ते 8 टक्के इतके वाढले होते.
Advertisement
Advertisement