महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुतगे येथील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

10:46 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा

Advertisement

वार्ताहर /सांबरा 

Advertisement

अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुतगे येथे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या कार्यालयासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन अखेर शेतकऱ्यांनी मागे घेतले आहे. दरवर्षी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारे बिनव्याजी कर्ज यावर्षी देण्यास संघाने विलंब केला होता. त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी सोमवारपासून ठिय्या आंदोलन छेडले होते व जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर बिनव्याजी कर्ज जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. त्यामुळे अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला होता.

अधिकाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न 

अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांची समजूत काढली व शेतकऱ्यांना लवकरात लवकर बिनव्याजी कर्ज मिळवून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या व त्यानुसार बुधवारी रात्री प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या कार्यालयात विशेष सर्वसाधारण सभा घेतली. त्यानंतर लवकरच कागदपत्रांची पूर्तता करून शेतकऱ्यांच्या खात्यावर बिनव्याजी कर्ज जमा करण्याचे आश्वासन दिले व संघाच्या व्यवहाराची चौकशी निपक्षपणे पूर्ण करून तातडीने अहवाल देण्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. यावेळी सहकार खात्याच्या संयुक्त निबंधकांनी युवा शेतकरी सचिन पाटील यांना पाणी देऊन त्यांचे उपोषण सोडविले. यावेळी अधिकारी वर्ग, पोलीस, सभासद शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article