For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

3,300 प्रतिटन ऊस दरासह आंदोलन समाप्त

01:15 PM Nov 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
3 300 प्रतिटन ऊस दरासह आंदोलन समाप्त
Advertisement

अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मिळाले यश : सरकारच्या मध्यस्थीतून निघाला तोडगा

Advertisement

चिकोडी : गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेले ऊस दरासाठीचे आंदोलन शुक्रवारी सरकारच्या मध्यस्थीने प्रतिटन उसास 3300 घोषणेसह संपले. सरकारच्या चर्चेतून तोडगा निघाल्याने शेतकरी संघटनेने आपले आंदोलन मागे घेतल्याचे घोषित करत आनंदोत्सव साजरा केला. निपाणी-मुधोळ रस्त्यावर गुर्लापूर फाट्यावर गेल्या नऊ दिवसांपासून दिवसरात्र आंदोलन केलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील विविध जिह्यांतून पाठिंबा मिळत होता. त्यानुसार आंदोलक शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली होती. दरम्यान संध्याकाळी शेतकरी संघटनेला सरकारचा निर्णय मान्य झाल्यावर शेतकऱ्यांनी गुर्लापूर क्रॉसवर जल्लोष केला.

शेतकरी संघटनेचा विजय असो, जय जवान जय किसान अशा घोषणा देत हिरवे टॉवेल उधळून शेतकऱ्यांनी जल्लोष केला. यंदा 3200 रुपयांवर दर देता येत नसल्याचे कारखानदारांनी म्हटले होते. त्यामुळे या आंदोलनाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले होते. अखेर नऊ दिवसांनी आंदोलन पूर्ण झाले. राज्य रयत संघटनेचे गौरवाध्यक्ष शशिकांत पडसलगी व चुनाप्पा पुजारी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सर्व शेतकऱ्यांचे मत जाणून हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. रयत संघटनेच्या नेत्यांना खांद्यावर घेऊन शेतकऱ्यांनी जल्लोष केला.

Advertisement

The agitation ended with sugarcane price at 3,300 per tonne.आंदोलनस्थळी विजयोत्सव सभेत बोलताना शशिकांत पडसलगी 

शेतक्रयांनी केलेल्या आंदोलनाची दखल सरकार व कारखानदारांना घ्यावी लागली. राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी व आम्ही दोघेही शेतक्रयांशी घट्ट राहिलो अनेकप्रकारे आमच्यात फुट पाडण्याचे प्रयत्न केले. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी चांगली मदत केली. त्यांच्या बदलीचेही प्रयत्न सुरू होते. एक रूपयाही देणार नसल्याचे म्हणणारे कारखानदार आता शेतक्रयांसमोर नमले आहेत. 3250 कारखानदार व 50 रूपये सरकार देणार आहे. त्यामुळे हा शेतक्रयांचा विजय आहे. शेतकरी एक असल्यावर काहीही होऊ शकते हे दाखवून दिले आहे. हत्तरगीजवळ झालेली दगडफेक ही शेतक्रयांनी केलेली नाही. ती काही समाजकंटकांकरवी करून आंदोलन बिघडविण्याचा प्रयत्न केला असल्याचेर यत संघटनेचे राज्य गौरवाध्यक्ष शशीकांत पडसलगी यांनी सांगितले.

शेतकरी संघटनेने ऊसाला प्रति टन 3500 रुपये दर देण्याची मागणी केली होती. कारखानदारांनी 3200 दर देण्यास संमती दर्शवली होती. राज्य सरकारने यामध्ये भाग घेत कारखानदारांनी 3250 रुपये व सरकारकडून प्रति टन 50 रुपये दर देण्याची घोषणा केली आहे. पण हे आंदोलन इथेच संपलेले नाही. आंदोलनात अनेक शेतकरी संघटना व इतर संघटना सहभागी झाल्या आहेत. शेतकरी संघटनेच्या एकूण 8 मागण्या असून त्यापैकी एक मागणी राज्य सरकारने जवळपास मान्य केले आहे. दराबाबतचे पत्र व आमच्या मागण्या याबाबत साखर मंत्र्यांनी गुर्लापूर येथे येऊन शेतकरी आंदोलकांशी चर्चा करावी तसेच मुख्यमंत्र्यांसोबत किमान दोन तास चर्चा केल्यानंतर ऊस रिकव्हरी व वजन काट्यातील पारदर्शकता याबाबतही निश्चितता येणे आवश्यक आहे. राज्यात जवळपास 80 साखर कारखाने असून साखर खात्यासाठी स्वतंत्र कायमस्वरूपी कमिशनर नियुक्त करावा यासह अनेक मागण्या असून त्याबाबत गुर्लापूर येथे उद्या आंदोलकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे मत शेतकरी संघटनेचे नेते चुन्नाप्पा पुजारी यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.