राष्ट्रवादीच्या माध्यमातून पुकारण्यात आलेले '' ते ''आंदोलन स्थगित
पुंडलिक दळवींची माहिती ;
सावंतवाडी । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर हे आंदोलन करण्यात येऊ नये अशी विनंती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांकडून तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना करण्यात आली आहे. राष्ट्रवादीनं केलेल्या मागण्यांच्या पुर्ततेसह इतरबाबींची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी पत्राद्वारे दिली आहे.
यात अपघात विभागात दाखल होणा-या रुग्णांना प्राथमिक उपचार देऊन संबंधित वैद्यकीय विशेष तज्ञ यांना कॉल करुन बोलवण्यात येते. व उपचार देण्यात येत आहेत. रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठवुन त्यांना आर्थिक झळ बसणार नाही याची दक्षता घेणेत येत आहे. बालरोगतज्ञ, सोनोग्राफीकरीता स्त्रीरोगतज्ञ यांना रविवारतसेच इतर सुट्टीच्या दिवशीही ऑन कॉल राहणेबाबत व तातडीच्या प्रसंगी उपस्थित राहुन सेवा पुरविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. रुग्णालयात पुरेसा औषध उपलब्ध असुन, आवश्यक औषधांची वेळोवेळी वरीष्ठ कार्यालयाकडे मागणी करणेत येते. तातडीचे वेळी आवश्यक औषध उपलब्ध नसल्यास स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात येते. तर रुग्णालयात मंजुर स्वच्छता कर्मचारी पदे रिक्त असलेने कंत्राटी पध्दतीने १२ स्वच्छता कर्मचारी पदे भरण्यात आलेली आहेत. व त्यांचेमार्फत रुग्णालयातील सर्व विभागांची नियमित ३ वेळा स्वच्छता केली जाते. संदर्भिय पत्रान्वये तसेच आपण प्रत्यक्ष दिलेल्या भेटीतील सुचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे असे लेखी पत्र देत आंदोलन करण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे.