महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कारवार मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज

10:29 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांचे आवाहन

Advertisement

कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघतील 7 मे रोजी होणारी मतदान प्रक्रिया सुरळीत, मुक्त, पारदर्शक आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी आणि कारवार जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांनी केले आहे. त्या येथे पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाल्या, कारवार लोकसभा मतदारसंघात कारवार जिल्ह्यातील सहा (कारवार, कुमठा, भटकळ, हल्याळ, यल्लापूर आणि शिरसी) आणि बेळगाव जिल्ह्यातील दोन (खानापूर आणि कित्तूर) अशा एकूण आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. मतदारसंघातील एकूण 14 तालुक्यातील (कारवार जिल्हा 12 आणि बेळगाव जिल्हा 6) एकूण 16 लाख 41 हजार 156 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी पुरूष मतदारांची संख्या 8 लाख 23 हजार 604, महिला मतदारांची संख्या 8 लाख 17 हजार 536 तर अन्य मतदारांची संख्या 16 इतकी आहे.

Advertisement

6 हजार 936 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 6 हजार 936 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना यापूर्वीच दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे. 1 हजार 15 कर्मचाऱ्यांची वेबकास्टींग, 303 कर्मचाऱ्यांची मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणून नियुक्ती केली आहे. 200 कर्मचाऱ्यांची सेक्टर अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. शिवाय 21 व्हिडिओग्राफर मतदान प्रक्रियेवर नजर ठेवून राहणार आहेत. मतदार संघातील मतदान केंद्रांची एकूण संख्या 1977 इतकी आहे. 85 वर्षावरील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान मतदानाचा दिवस मंगळवारी (7 मे) आला असल्याने मतदारसंघातील जाहीर प्रचाराच्या सभांना रविवारी संध्याकाळी सुटी देण्यात आली.

आजअखेर अडीच कोटी रुपये किमतीची दारू जप्त

मतदारसंघात आचारसंहिता लागू झाल्यानंतर आजअखेर 2 कोटी 52 लाख 41 हजार 188 रुपये किंमतीची 1 लाख 13 हजार 876 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. 68 हजार 500 रुपये किंमतीच्या 3.827 किलो ग्रॅम मादक पदार्थ जप्त करण्यात आले आहे. 84 लाख 87 हजार 847 रुपये किंमतीचे सोने आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. याशिवाय 36 लाख 43 हजार 300 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पुढे बोलताना जिल्हाधिकारी मानकर यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article